वृत्तसंस्था
मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB)चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना पुन्हा मुदत वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील 6 महिने तरी ते याच पदावर कायम राहणार आहे. त्यांना मिळालेली ही मुदतवाढ आता बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासाठी अधिक अडचणीची ठरु शकते.आर्यनच्या अटकेत समीर वानखेडे यांची महत्त्वाची भूमिका होती. Sameer Wankhede: Sameer Wankhede extended; Another six months as Divisional Director of NCB
समीर वानखेडे यांना मिळालेल्या मुदतवाढीमुळे क्रूझ ड्रग्स प्रकरण त्यांना तडीस लावत येणार आहे. क्रूझ ड्रग्स प्रकरणात आर्यन खान याला 15 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याने तो सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे. या संपूर्ण कारवाईमध्ये समीर वानखेडे यांचा मोठा सहभाग होता. त्यामुळेच आता समीर वानखेडे यांना मिळालेली मुदतवाढ ही आर्यन खानसाठी डोकेदुखी ठरू शकते.
महाराष्ट्राचे रहिवासी असलेले समीर वानखेडे २००८ च्या बॅचचे IRS ऑफिसर आहेत. प्रशासकीय सेवेत लागू झाल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली पोस्टींग मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर डेप्युटी कस्टम कमिशनर म्हणून झाली होती. यानंतर आपल्या कामात दाखवलेल्या प्रावीण्यामुळे समीर वानखेडे यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीला पाठवण्यात आलं. अमली पदार्थविरोधी प्रकरणांमध्ये तपासात समीर वानखेडे यांचा विशेष हातखंडा मानला जातो. समीर वानखेडेंच्या नेतृत्वाखालीच गेल्या दोन वर्षांत १७ हजार कोटींच्या अमली पदार्थ तस्करीचं रॅकेट उध्वस्त केलं आहे. मागच्या वर्षातच वानखेडे यांनी DRI मधून NCB मध्ये बदली करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App