नवाब मलिकांच्या जावयावर कारवाई केली. त्यामुळे नवाब मलिक आरोप करत आहेत”. असं आठवले म्हणाले.”Sameer Wankhede is a follower of Babasaheb, injustice is being done to Dalit officer” – Ramdas Athavale
विशेष प्रतिनिधी
मुंबई : नवाब मलिकांकडून वारंवार समीर वानखेडे यांच्यावर आरोप होत असल्याने क्रांती रेडकर यांनी रामदास आठवलेंची भेट घेतली. दरम्यान रामदास आठवले आणि क्रांती रेडकर यांची अर्धा तास चर्चा झाली.त्यानंतर रामदास आठवले यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
यावेळी रामदास आठवले म्हणाले की, ”समीर वानखेडे हे दलित अधिकारी आहेत.ज्ञानेश्वर वानखेडे हे समीर वानखेडेंचे वडील आहे.ते मुस्लीम नाहीत. ते बाबासाहेबांचे अनुयायी आहेत. वाशिम जिल्ह्यातील वरुडतोफा गावचे रहिवासी आहेत. मुंबईत ते एक्साईज विभागात नोकरीला होते. क्रांती रेडकर या समीर वानखेडे यांच्या पत्नी आहेत. तसेच नवाब मलिकांच्या जावयावर कारवाई केली. त्यामुळे नवाब मलिक आरोप करत आहेत”.
समीर वानखेडे यांच्यावर अन्याय होता कामा नये. जे काही असेल तर तुम्ही न्यायालयात जा आणि सिद्ध करून दाखवा. समीर वानखेडेंना पैसे खायचे असते तर त्यांनी असं लोकांना पकडलेच नाही.”, असंही आठवले म्हणाले.
पुढे रामदास आठवले म्हणले की ”आर्यन खानजवळ काही ड्रग्स सापडलं नाही, असं काही लोकांचं म्हणण असेल तर कोर्टाने २५ दिवस जामीन का दिला नाही? प्रभाकर साईलला पैसे देऊन त्याला समीर वानखेडेंवर आरोप करण्यास सांगितले आहे. वानखेडे कुटुंबीयांबाबत खोटं बोलले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App