जोधा-अकबर चित्रपटावरून झालेल्या दंगल प्रकरणात संभाजी भिडे यांचे वॉरंट रद्द


विशेष प्रतिनिधी

सांगली : शहरात २००८ मध्ये जोधा-अकबर या चित्रपटावरून झालेल्या दंगल प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचे पकड वॉरंट रद्द करत त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.माजी आमदार नितीन शिंदे, शिवसेनेचे नेते बजरंग पाटील व अन्य ७० जणांचेही पकड वॉरंट मुख्य न्यायदंडाधिकारी पी. पी. केस्तीकर यांनी रद्द केले.Sambhaji Bhide’s warrant canceled in riot case over Jodha-Akbar movie

सांगली शहरात २००८ मध्ये जोधा-अकबर चित्रपटाच्या प्रदर्शनावरून वाद झाला होता. हा चित्रपट हिंदूविरोधी व हिंदूंच्या भावना दुखावणारा असल्याचे म्हणत शहरातील काही हिंदुत्ववादी संघटनांनी दंगल घडवली होती. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांवरही हल्ल्याचा प्रयत्न झाला होता.या घटनेनंतर संभाजी भिडे, नितीन शिंदे, बजरंग पाटील,



सुनीता मोरे यांच्यासह सुमारे ९७ जणांविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या सुनावणीला संशयित गैरहजर राहात असल्याने मुख्य न्यायदंडाधिकारी केस्तीकर यांनी काही संशयितांविरुद्ध पकड वॉरंट तर काहीजणांविरुद्ध जामीनपात्र वॉरंट काढले होते.

न्यायालयाने भिडे यांना १५ हजार रुपये जातमुचलक्यावर वॉरंट रद्द करत जामीन मंजूर केला. माजी आमदार नितीन शिंदे यांना २०० रुपये दंड केला तर बजरंग पाटील व सुनीता मोरे व इतर दोघांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची अनामत भरण्याचे आदेश देण्यात आले.

१ फेब्रुवारी रोजी त्यांनी जामीन घेऊन पुन्हा न्यायालयात हजर राहायचे आहे. या प्रकरणातील संशयितांना न्यायालयाकडून वॉरंट बजाविण्यात आल्यानंतर संभाव्य अटक टाळण्यासाठी ७० संशयितांनी न्यायालयात हजर होत वॉरंट रद्दसाठी अर्ज सादर केला होता.

Sambhaji Bhide’s warrant canceled in riot case over Jodha-Akbar movie

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात