मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान पत्रकार गैरवर्तन प्रकरणात अडकला आहे. या प्रकरणी पत्रकाराने अभिनेत्याबद्दल फिर्याद केली होती. त्यानंतर सलमान खानला मुंबईतील न्यायालयाने आज म्हणजेच ५ एप्रिल रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र आता हे टाळण्यासाठी सलमान खानने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाच्या या आदेशाविरोधात सलमान खानने मुंबई उच्च न्यायालयात अपील केले आहे.Salman seeks stay in summons Journalist Abuse Case
अभिनेत्याने आपल्या याचिकेत उच्च न्यायालयाकडे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश जारी करण्याची प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली आहे. यासोबतच त्यांनी समन्सला स्थगिती देण्याची मागणीही केली आहे.
प्रकरण २०१९ सालचे आहे. पत्रकार अशोक पांडे यांनी सलमान खानच्या विरोधात तक्रार केली होती. तो त्याच्या कॅमेरामनसोबत जुहूहून कांदिवलीला जात होता तेव्हा त्याने सलमान खानला रस्त्यात पाहिले. यादरम्यान त्याला सलमान खान सायकल चालवतानाचा व्हिडिओ बनवायचा होता आणि त्याने अभिनेत्याच्या बॉडीगार्डची परवानगीही घेतली होती. पण जेव्हा त्याने व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तेव्हा सलमान खानने त्याला विरोध केला.
पत्रकाराने आरोप केला आहे की अभिनेत्याने त्याच्यावर हल्ला केला आणि नंतर फोन हिसकावला. सलमान खानच्या अंगरक्षकाने पत्रकाराला मारहाण केल्याचा आरोपही आहे. पत्रकाराच्या या आरोपांनंतर सलमान खानवर अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस अहवालात म्हटले आहे की अभिनेत्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ५०४ (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान) आणि ५०६ (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App