Kamaal R Khan : बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानने अभिनेता कमल आर. खान (केआरके) विरुद्ध मुंबई कोर्टात मानहानीची तक्रार दाखल केली आहे. हे प्रकरण सलमान खानच्या फिल्म ‘राधे’च्या समीक्षेशी संबंधित आहे. सोमवारी सलमान खानच्या लीगल टीमच्या वतीने कमल आर. खानला दिलेल्या तक्रारीसंदर्भात नोटीस पाठविण्यात आली आहे. salman khan has filed a defamation Case against actor kamaal r khan For radhe Movie review
विशेष प्रतिनिधी
मुंबई : बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानने अभिनेता कमल आर. खान (केआरके) विरुद्ध मुंबई कोर्टात मानहानीची तक्रार दाखल केली आहे. हे प्रकरण सलमान खानच्या फिल्म ‘राधे’च्या समीक्षेशी संबंधित आहे. सोमवारी सलमान खानच्या लीगल टीमच्या वतीने कमल आर. खानला दिलेल्या तक्रारीसंदर्भात नोटीस पाठविण्यात आली आहे. नोटिशीनुसार, सलमान खानची लीगल टीम गुरुवारी दिवाणी कोर्टाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांकडे तातडीने सुनावणीसाठी हे प्रकरण ठेवणार आहे.
https://twitter.com/kamaalrkhan/status/1397181935370260485?s=20
यावर कमल आर. खाननेही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याने ट्वीट करून लिहिले की, प्रिय सलमान खान, हा मानहानीचा खटला म्हणजे तुझ्या निराशेचा व हताशेचा पुरावा आहे. मी माझ्या फॉलोअर्ससाठी समीक्षा करतो आणि मी माझे काम करत आहे. मला तुमच्या चित्रपटांची समीक्षा करण्यापासून रोखण्याऐवजी तुम्ही काही चांगले चित्रपट बनवावेत. मी सत्यासाठी लढतच राहणार आहे. धन्यवाद! दरम्यान, केआरके हा बॉलीवूड चित्रपटांची आपल्या खास शैलीत समीक्षा करत असतो. त्याने दुबईत राधे सिनेमाचा पहिला हाफ पाहून समीक्षा केली. केआरकेच्या मते हा चित्रपट चांगला नाही.
रिव्ह्यू करताना केआरके म्हणाला- पहिला हाफ पाहिल्यानंतर काहीच समजले नाही. कथा म्हणजे काय, पात्र काय आहे, काय होत आहे? माझा मेंदू थकून गेला. मला समजले नाही. गाणी वगैरे ठीक आहेत, पण हे का घडले हे कळायला मार्ग नाही. मध्यंतरानंतर थिएटरमध्ये जाण्यास मन धजावत नाही.
‘राधे’ चित्रपटाबद्दल सांगायचे झाले, तर ते 13 मे रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला. सलमानव्यतिरिक्त जॅकी श्रॉफ, दिशा पाटनी आणि रणदीप हूडासारखे स्टार होते. प्रभुदेवाने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
salman khan has filed a defamation Case against actor kamaal r khan For radhe Movie review
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App