NIA कोर्टाने मुंबई पोलिसांतील माजी अधिकारी सचिन वाझे यांचा वैद्यकीय अहवाल मागविला आहे. सचिन वाजेंच्या वकिलांनी न्यायालयात अर्ज केला होता की, त्यांच्या अशिलास छातीत वेदना आणि हृदयविकाराचा त्रास आहे. यानंतर एनआयए कोर्टाने वाझे यांचा वैद्यकीय अहवाल मागविला आहे. सचिन वाझे हे अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन खून प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. त्यांना एनआयएने 13 मार्च रोजी अटक केली होती. त्यांची कोठडी शनिवारीच संपणार आहे. Sachin Waze suffers from chest pain and heart blockage, NIA court asks medical report
विशेष प्रतिनिधी
मुंबई : NIA कोर्टाने मुंबई पोलिसांतील माजी अधिकारी सचिन वाझे यांचा वैद्यकीय अहवाल मागविला आहे. सचिन वाजेंच्या वकिलांनी न्यायालयात अर्ज केला होता की, त्यांच्या अशिलास छातीत वेदना आणि हृदयविकाराचा त्रास आहे. यानंतर एनआयए कोर्टाने वाझे यांचा वैद्यकीय अहवाल मागविला आहे. सचिन वाझे हे अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन खून प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. त्यांना एनआयएने 13 मार्च रोजी अटक केली होती. त्यांची कोठडी शनिवारीच संपणार आहे.
सचिन वाझे यांचे वकील रौनक नाईक यांनी कोर्टाकडे अर्ज केला आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, छातीत वेदनांबरोबरच सचिन वाझे यांच्या हृदयात 90 टक्क्यांचे दोन ब्लॉकेज आहेत. म्हणून वाझे यांना त्यांच्या हृदयरोग तज्ज्ञाशी भेट घेऊ दिली जावी. जेणेकरून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होऊ शकतील. यानंतर कोर्टाने वाझे यांचा वैद्यकीय अहवाल मागविला आहे. वाझे यांना आज एनआयए कोर्टात हजर केले जाईल, तेव्हा हे मेडिकल रिपोर्ट पाहिले जातील.
एनआयएने सचिन वाझे यांच्याविरुद्ध बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंध) कायद्याची अनेक कलमे लावली आहेत. यामुळे आता एनआयएला वाझे यांची 30 दिवसांची कोठडी मागण्याचा अधिकार मिळाला आहे. तर भादंविनुसार एका वेळी फकत 14 दिवसांची कोठडी मिळते. याशिवाय यूएपीए अंतर्गत् तपास संस्थेला 180 दिवसांत चार्जशीट दाखल करू शकते. परंतु भादंवि मध्ये ही वेळ मर्यादा 90 दिवसांचीच आहे.
25 फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराबाहेर एक स्कॉर्पिओ सापडली होती. यामधून 20 जिलेटिन (स्फोटक) कांड्या जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच धमकी देणारे पत्रही मिळाले होते. घटनेच्या दुसर्या दिवशी म्हणजेच 26 फेब्रुवारी रोजी या स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेन असल्याचे कळले. परंतु त्यांनी 17 फेब्रुवारीलाच कोर चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. 6 मार्चला संशयास्पद अवस्थेत मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळला. सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचे सांगण्यात आले, परंतु मनसुख हिरेन यांच्या पत्नीने ही हत्या असल्याचे म्हटले. हे पूर्ण प्रकरण एनआयएला चौकशीसाठी सोपवण्यात आले. 13 मार्च रोजी एनआयएने मुंबई पोलिसांतील माजी एपीआय सचिन वाझे यांना अटक केली. मनसुख हिरेनची हत्या आणि अँटिलिया केसमध्ये सचिन वाझे मुख्य आरोपी आहे.
Sachin Waze suffers from chest pain and heart blockage, NIA court asks medical report
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App