अनिल देशमुखांनंतर दुसरा मंत्री कोण… सचिन वाझेंनी लेटरबाँम्बमधून अनिल परबांचे नाव घेतल्याने उलगडले कोडे!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई – मुंबईचे बदली करण्यात आलेले पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या पाठोपाठ सचिन वाझे यांनी देखील लेटरबाँम्ब टाकून राज्याला हादरवून टाकले आहे. यात वाझेंनी राजीनामा द्यावा लागलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बरोबरच अनिल परबांचेही नाव घेतल्याने… १०० च्या खंडणीखोरीतला दुसरा मंत्री कोण याचेही कोड़े उलगडले आहे. sachin vaze letter bomb; anil parab second minister in the net

संबंधित पत्र सचिन वाझे यांनी प्रेसला लिहिलेले नाही किंवा सोशल मीडियावर शेअर केलेले नाही, तर थेट केंद्रीय तपास यंत्रणा एनआयएला लिहिले असल्याने या पत्राचे गांभीर्य कितीतरी पटींनी वाढलेले आहे. या पत्रातले तपशील आणि नावे एवढी हायप्रोफाइल आहेत, की एनआयए या सगळ्यांना म्हणजे शरद पवारांसह अनेक नेत्यांना चौकशी आणि तपासाच्या जाळ्यात आणू शकते.सचिन वाझेंनी शिवसेनेचे मंत्री अनिल परबांनी कसे पैसे गोळा करायला सांगितले होते, त्याचे तपशील पत्रात दिले आहेत. त्यांनी केव्हा शासकीय बंगल्यावर बोलावले. मुंबई महापालिकेच्या ५० ठेकेदारांची नावे देऊन त्यांच्याकडून पैसे गोळा करण्यास सांगितले वगैरे तपशील पत्रात लिहिले आहेत. हे तपशील म्हणजे एनआयएच्या तपासासाठी एक – एक धागा ठरू शकतो आणि तपासाचे धागेदोरे अनिल परब आणि अनिल देशमुख यांच्यापेक्षा मोठ्या माशांपर्यंत पोहोचू शकतात. हे पत्रातल्या तपशीलातून स्पष्ट होते आहे.

अनिल परब हे मातोश्रीच्या सर्वांत जवळचे मंत्री मानले जातात. हा संदर्भ देखील तपासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो.

२ कोटी आणि पवारांचे मतपरिवर्तन

त्याचवेळी सचिन वाझेंनी आपल्या गुन्हेगारी गुप्तवार्ता शाखेत नियुक्तीसाठी अनिल देशमुखांनी २ कोटी रूपयांची खंडणी मागितल्याचे लिहिले आहे. हे २ कोटी रूपये शरद पवारांच्या मतपरिवर्तनासाठी होते, असे वाझेंनी लिहिले आहे… सचिन वाझेंना गुन्हेगारी गुप्तवार्ता शाखेत नियुक्ती मिळाली होतीच. याचा अर्थ शरद पवारांचे मतपरिवर्तन झाले होते का… ते अनिल देशमुखांनी केले होते का… केले असल्यास कोणत्या प्रकारे मतपरिवर्तन केले… याचे खुलासे होणे आता बाकी आहे. कारण सचिन वाझे निलंबित झाले तेव्हा ते गुन्हेगारी गुप्तवार्ता शाखेतच नियुक्तीला होते.

sachin vaze letter bomb; anil parab second minister in the net

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*