प्रतिनिधी
मुंबई : ऋतुजा लटकेंचा राजीनामा महापालिकेत लटकल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत प्लॅन बी आखणे भाग पडले आहे. या प्लॅन बी नुसार ऋतुजा लटके यांच्या ऐवजी मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर किंवा प्रमोद सावंत यांना उमेदवारी देण्याचे घाटत आहे. Rutuja Latke’s resignation row : political compulsion arose Shivsena UBT for making plan B
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने घेतला होता. पण त्या मुंबई महापालिका तिसऱ्या श्रेणीतील कर्मचारी आहेत. त्यांनी 3 ऑक्टोबर 2022 रोजी आपला राजीनामा सादर केला आहे. या राजीनामा पत्रात त्यांनी वैयक्तिक करण्यासाठी राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे.
अंधेरी पूर्व पोटनिवडणूक : ऋतुजा लटकेंच्या उमेदवारीसाठी शिवसेना UBT ची न्यायालयात धाव; पण खुद्द ऋतुजांच्या मनात काय??
कायदा आणि नियमानुसार त्यांच्या राजीनाम्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे एका महिन्याची मुदत आहे. मात्र या मुद्द्यावरून शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाने शिंदे – फडणवीस सरकारवर शरसंधान साधले आहे. सरकारच्या दबावामुळे ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिका स्वीकारत नसल्याचा आरोप अनिल परब यांनी केला आहे.
मात्र मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग शहर यांनी या संदर्भात स्पष्ट खुलासा करून ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याची 3 ऑक्टोबर 2022 ही तारीख सांगून कायदा आणि नियमानुसार एक महिन्याची मुदत निर्णय घेण्यासाठी असल्याचे स्पष्ट केले आहे. या कायदेशीर पेचातून मार्ग काढण्यासाठी शिवसेना ऋतुजा लटके यांनी मुंबई हायकोर्टात अर्ज केला आहे. परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मात्र पोटनिवडणुकीत उमेदवार उतरवण्यासाठी प्लॅन बी तयार करावा लागला आहे. या प्लॅन बी नुसार मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर किंवा प्रमोद सावंत यांना उमेदवारी देण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App