MPSC मार्फत ८१६९ पदांसाठी भरती; अर्ज करण्यासाठी मुदतवाढ; वाचा नवी तारीख

प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC मार्फत मेगाभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात असून यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १४ फेब्रुवारी होती. परंतु आता या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. फॉर्म भरण्यासाठी आयोगाने एक आठवड्याची मुदतवाढ दिली आहे.Recruitment for 8169 posts through MPSC; Extension of time to apply; Read the new date



अर्ज करण्यासाठी मुदतवाढ 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क संयुक्त सेवा परीक्षेसाठी मुदत वाढ जाहीर करण्यात आल्याची सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. दिनांक २० जानेवारी रोजी संयुक्त सेवा परीक्षा म्हणजेच कम्बाईनसाठी जाहिरात काढण्यात आली होती. परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख १४ फेब्रुवारी होती. दरम्यान आयोगाने परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी २१ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

राज्यात तब्बल ८१६९ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याची जाहिरात काढली आहे. महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त सेवा मुख्य परीक्षा २ सप्टेंबर २०२३ रोजी तर महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा ९ सप्टेंबर २०२३ रोजी होणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू करण्यात येणार आहे. या उमेदवारांचा पे स्केल १९९०० ते ६३२०० या दरम्यान असणार आहे.

Recruitment for 8169 posts through MPSC; Extension of time to apply; Read the new date

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात