100 कोटींची वसुली : परमवीर सिंगांनी सीबीआय जबाबात घेतली ठाकरे – पवारांची नावे!!; गंभीर कारवाईची टांगती तलवार!!


वृत्तसंस्था

मुंबई : महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारला एका पाठोपाठ एक जोरदार दणके बसत आहेत. ते आता फक्त राजकीय स्वरूपाचे उरले नसून कायदेशीर गंभीर दणके बसण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कारण मुंबईतील हॉटेल रेस्टॉरंट अँड बार चालकांकडून 100 कोटींची खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणात मुंबईचे बदली करण्यात आलेले पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची नावे घेतली आहेत.Recovery of Rs 100 crore: Paramvir Singh responds to CBI – Thackeray’s names !!; Sword of serious action !!

100 कोटींची वसुली करण्याचे काम अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला दिले होते. या सर्व प्रकरणाची माहिती उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना दिली होती. अनिल देशमुख यांच्या या खंडणीखोरीची सर्व माहिती ठाकरे आणि पवार यांना होती. तरी देखील त्यांनी काही केले नाही. देशमुखांना रोखले नाही. या सर्व प्रकरणात या दोन्ही नेत्यांचाही हात असावा, असा जवाब परमवीर सिंग यांनी सीबीआयचा तपास दिला आहे. हा जवाब सीबीआय कोर्टात सादर झाला आहे.



महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारला आधीच घरघर लागली आहे. राज्यसभा आणि विधान परिषदेत दणकून पराभव झाला आहे. शिवसेना आणि काँग्रेस दोन पक्ष आतून राजकीय दृष्ट्या हादरले आहेत. परंतु परमवीर सिंग यांच्या जबाबातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कायदेशीरदृष्ट्या धक्का बसू शकतो एवढा परमवीर सिंग यांचा सीबीआयला दिलेला हा जबाब गंभीर आहे.

सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेण्यासाठी आणि देशमुखांनी दबाव आणला होता. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सामील होते. सचिन वाझेच्या ट्रॅक रेकॉर्ड बद्दल त्यांच्या काही गोष्टी निदर्शनास आणून दिल्यानंतर अनिल देशमुख हे माजी गृहमंत्री आहेत, असे उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते, असेही परमवीर सिंग यांनी जबाबात म्हटले आहे.

अनिल देशमुख यांच्या सर्व कृत्यांची माहिती उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना दिली होती. त्यांना या सर्व गैरव्यवहारांची माहिती आधीच माहिती होती. परंतु त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा गंभीर स्वरूपाचा आरोपही परमवीर सिंग यांनी सीबीआयला दिलेल्या आपल्या आपल्या जबाबात केला आहे.

ठाकरे – पवारांची चौकशी शक्य

या संदर्भात सीबीआय पुढची कारवाई करून कोर्टामार्फत उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना थेट चौकशीसाठी आणि तपासासाठी पाचारण करू शकते एवढा सीबीआयच्या सीबीआयला दिलेला परमवीर सिंग यांचा जबाब गंभीर आहे

Recovery of Rs 100 crore: Paramvir Singh responds to CBI – Thackeray’s names !!; Sword of serious action !!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात