रेकॉर्डब्रेक ५५ वर्षे आमदार राहिलेले शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन

विशेष प्रतिनिधी

सोलापूर – शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे रात्री साडे नऊ वाजता अश्विनी हॉस्पिटल सोलापूर येथे उपचार दरम्यान निधन झाले. वयाच्या 95 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतल.Record-breaking 55-year-old MLA and senior PEC leader Ganapatrao Deshmukh passes away

विधानसभेचे विद्यापीठ अशी ओळख असलेले गणपतराव देशमुख 55 वर्षे आमदार होते. ते ११ वेळा सांगोला मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते. यशवंतराव चव्हाण ते देवेंद्र फडणवीस या मुख्यमंत्र्यांची कारकीर्द त्यांनी आमदार म्हणून पाहिली.



त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.गणपत देशमुखांना संपूर्ण राज्यभरात आबा नावाने त्यांना हाक मारली जात होती. 1962 ला त्यांनी सांगोल्यातून सर्वप्रथम निवडणूक लढली होती. सुरूवातीपासून गणपत देशमुख शेतकरी कामगार पक्षात होते.

1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापन केले होते. त्यावेळी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला.1999 मध्ये गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. 2012 मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास 50 वर्षे पूर्ण झाल्याने सभागृहासह सरकारनेही त्यांचा गौरव केला होता. 2019 ला राजकारणातून निवृत्ती घेतली. नातू डॉ. अनिकेत देशमुख याने या मतदारसंघात निवडणूक लढवली. पण तो पराभूत झाला.

Record-breaking 55-year-old MLA and senior PEC leader Ganapatrao Deshmukh passes away

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात