अलिबाग येथील जमीन रश्मी ठाकरे यांच्यासह लाटल्याचा आरोप, रवींद्र वायकर यांनी किरीट सोमय्या यांच्यावर लावला १०० कोटीचा दावा


अलिबागच्या कोलई येथील जमीन प्रकरणात रश्मी ठाकरे यांच्यावर भाजपनेते किरीट सोमय्या यांनी आरोप केल्याने आमदार रवींद्र वायकर संतप्त झाले आहेत. त्यांनी सोमय्या यांच्यावर १०० कोटी रुपये मानहानीचा दावा लावला आहे.Ravindra Vaikar sues Kirit Somaiya for Rs 100 crore


विशेष प्रतिनिधी 

मुंबई: अलिबागच्या कोलई येथील जमीन प्रकरणात रश्मी ठाकरे यांच्यावर भाजपनेते किरीट सोमय्या यांनी आरोप केल्याने आमदार रवींद्र वायकर संतप्त झाले आहेत. त्यांनी सोमय्या यांच्यावर १०० कोटी रुपये मानहानीचा दावा लावला आहे.

सौ. रश्मी उध्दव ठाकरे यांच्या नावाने कोलई गावात अन्वय नाईक यांच्याकडून ३० जमीनी मिळकती २९ एप्रिल २०१४ मध्ये घेण्यात आल्या होत्या. या जमीनीचे करार, ग्रामपंचायतमध्ये केलेले अर्ज, रजिस्ट्रेशन, त्यांच्यावरील १९ बंगले याचे पुरावे आमच्याकडे असल्याचा आरोप सोमय्या यांनी केले होते.



घरपट्टी, पाणीपट्टी रश्मी ठाकरे आणि मनिषा रविंद्र वायकर भरत असल्याचेही त्यांनी म्हटले होते. याच अन्वय नाईक यांनी नंतर आत्महत्या केली. रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी इंटेरिअरचे पैसे दिले नसल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता. गोस्वामी यांना या प्रकरणी अटकही करण्यात आली होती.

आता वायकर यांनी सोमय्या यांच्यावर १०० कोटी रुपयांचा दावा लावला आहे. स्वत:च्या फायद्यासाठी अलिबाग येथील कोर्लई तसेच महाकाली गुंफा जमीन प्रकरणी सातत्याने बिनबुडाचे आरोप करुन आपली, आपल्या कुटुंबाची तसेच पक्षाची नाहक बदनामी करुन जनमानसातील लोकप्रतिनिधीची प्रतिमा मलिन करुन मानसिक त्रास दिला.

त्यामुळे आमदार रविंद्र वायकर यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. अलिबाग कोर्लई येथील संपुर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पाडून संयुक्तरित्या खरेदी केलेल्या जमिनीवर १९ बंगले असल्याचा आणि वरील माहिती निवडणुक आयोगाकडे सादर करण्यात

आलेल्या प्रतिज्ञापत्रात लपविण्यात आल्याचा दावा सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध समाजमाध्यमांद्वारे केला होता. यावेळी या जमिनीवरील बंगल्याचा वापर व्यवसायासाठी केल्याचा तसेच या दोघांमधील आर्थिक हितसंबंध काय आहे, असा आरोपही सोमय्या यांनी केला होता.

त्यानंतर महाकाली गुंफा येथील जमिनप्रकरणी वायकर यांना अविनाश भोसले व शाहीद बलवांकडून २५ कोटी रुपयांचा मोबदला मिळाल्याचा आरोपही सोमय्यांनी पत्रकार परिषदेत विविध समाजमाध्यमांद्वारे केला. हे आरोप करतानाही त्यांनी कुठलेही सबळ पुरावे सादर केले नाहीत.

किरीट सोमय्या हे सातत्याने स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी लोकप्रतिनिधीची आपली जनमानसातील प्रतिमा, आपल्या कुटुंबाची तसेच पक्षाची प्रतिमा मलिन करुन मानसिक त्रास देत असल्याने, वायकर यांनी सोमय्या यांना या दोन्ही प्रकरणी जाहीर माफी न मागितल्यास सिव्हील व क्रिमिनल कायदेशी कारवाई करण्याचा इशारा सोमय्या यांना नोटीसीद्वारे दिला होता.

या दोन्ही प्रकरणी वायकर यांनी मुंबई पोलिस आयुक्त तसेच एम.आय.डी.सी पोलिस ठाण्यास पत्र देऊन बेताल व बिनबुडाचे वक्तव्य करुन जनमानसातिल लोकप्रतिनिधीची प्रतिमा मलिन करणाऱ्या किरीट सोमय्या यांना लगाम घालण्याची उचित ती कारवाई करण्याची विनंतीही या अगोदर केली आहे.

किरीट सोमय्या यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात रुपये १०० कोटींचा अबुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. एवढेच नव्हे तर लवकरच ते क्रिमीनल दावाही दाखल करणार असल्याचे वायकर यांनी सांगितले.

Ravindra Vaikar sues Kirit Somaiya for Rs 100 crore

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात