प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांची राजकीय शिष्टाई गोव्यात फसली. त्यांनी मांडलेला महाविकास आघाडीचा प्रस्ताव काँग्रेसने फेटाळला. परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गोवा, उत्तर प्रदेश आणि मणिपूर या तीन राज्यांमध्ये निवडणूक लढविण्याचे जाहीर केल्यानंतर संजय राऊत यांना देखील पुन्हा उत्साह आला आहे.Raut moved after Pawar; Goa – UP will change 100% !!
त्यांनी गोवा आणि उत्तर प्रदेशात 100% परिवर्तन होईल लिहून ठेवा असे वक्तव्य केले आहे.गोव्यात शिवसेना 9 जागा लढवणार आहे तर उत्तर प्रदेशात 50 जागा लढवणार आहे, असे संजय राऊत यांनी जाहीर केले आहे.
शरद पवार यांनी मात्र पत्रकार परिषदेत समाजवादी पक्षाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस युती करून निवडणूक लढवेल, असे जाहीर केले आहे. परंतु त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागांचा आकडा जाहीर केलेला नाही.
फक्त मणिपूरमध्ये काँग्रेस समवेत राष्ट्रवादी काँग्रेस 5 जागा लढवेल एवढेच शरद पवार म्हणाले आहेत. गोवा आणि उत्तर प्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेस नेमक्या किती जागा लढवेल याचा आकडा शरद पवार यांनी जाहीर केलेला नाही. त्याआधी संजय राऊत यांनी मात्र गोव्यात 9 जागा आणि उत्तर प्रदेशात 50 जागा शिवसेना लढवणार असल्याचे जाहीर करून टाकले आहे.
उत्तर प्रदेशात भाजपमधून मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिल्यानंतर अन्या तीन आमदारांनी देखील राजीनामा दिला आहे. यावरून काही लोकांना सत्ता परिवर्तनाचे वारे लवकर कळते असे संजय राऊत म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App