विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र सरकारला मंत्रीमंडळात गुन्हेगारी मंत्री नसावा असे वाटत असेल तर, त्यांनी नवाब मलिकचा तात्काळ राजीनामा घ्यावा असा सल्ला केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिला आहे.Raosaheb Danve’s allegation is that NCP’s support for Nawab Malik is support for Dawood gang
राष्ट्रवादी कॉँग्रेस नवाब मलिकला पाठिंबा देऊन मलिकांचे नव्हे तर, दाऊद इब्राहिम टोळीचे समर्थन करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून,
अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणानंतर भाजपसह केंद्रावर हल्लाबोल केला आहे. या सर्वामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेवरून हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसने अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर मोर्चे काढले नाहीत मात्र आता काढले जात आहेत, यावरही टीका होत आहें.
मलिकांच्या अटकेनंतर घटनेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. नवाब मलिक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊ नये, असे मत ममता यांनी व्यक्त केले असून, या मुद्द्यावर स्वत: राष्ट्रवादीच्या पाठीशी असल्याचे आश्वासन ममता बॅनर्जी यांनी शरद पवार यांना दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App