राणे विरूध्द शिवसेना; वर्षानुवर्षे रंगला कलगीतुरा; वेंगुर्ल्यात घातला गळ्यात गळा…!!

प्रतिनिधी

वेंगुर्ले – सध्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी १२ वर्षांपूर्वी शिवसेना सोडल्यानंतर रंगलेला कलगीतुरा आज वेंगुर्ल्यात गळ्यात गळा घालण्यात रूपांतरित झालेला दिसला. Rane family and shiv sena spat turned into political hobnobing in vengurla

वेंगुर्ले नगरपरिषदेच्या सागररत्न मासे बाजारपेठेच्या लोकार्पणाच्या सोहळ्यात राणे आणि शिवसेना नेत्यांनी गळ्यात गळा घातल्याचे बघायला मिळाले. यावेळी शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी एकाच व्यासपीठावर बसले होते. शिवसेना खासदार आणि शिवसेना सचिव विनायक राऊत, शिवसेना आमदार दिपक केसरकर आणि भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण, भाजपचे आमदार नितेश राणे एकाच व्यासपीठावर होते.राणे आणि शिवसेना यांच्यातील राजकीय कलगीतुरा १२ वर्षे चालला. पण नितेश राणे आणि विनायक राऊत हे व्यासपीठावर एकमेकांच्या कानात हितगुज करताना पाहायला मिळाले. नितेश राणेंनी तर जाहीर भाषणातून शिवसेना आणि भाजपच्या युतीवर भाष्य केले. हल्ली युतीची चर्चा बंद होती पण हे चित्र पाहिल्यानंतर युतीची चर्चा करणाऱ्यांना चांगली झोप लागेल, या चित्रामुळे युतीची चर्चा नक्की पुन्हा रंगेल. भाजपच्या वरिष्ठांनी आदेश दिला तर आम्ही दोन्ही पक्ष एकत्र मिळून काम करू, असे वक्तव्य करून त्यांनी कार्यक्रमात रंगत आणली.

नितेश राणे हे भाषण संपवून व्यासपीठाच्या खुर्चीवर बसताच खासदार विनायक राऊत यांनी नितेश राणे यांची पाठ थोपटली. खासदार विनायक राऊत यांनी जाहीर भाषणात आपण आणि नितेश राणे मित्र असल्याचे सांगितले. मी नितेश राणे यांचे अभिनंदन करतो. अभिनंदन करायला सुद्धा मन मोठे लागते. कोकणातले राजकीय नेते विकासकामांसाठी एकत्र येतात, असे विनायक राऊत म्हणाले.

Rane family and shiv sena spat turned into political hobnobing in vengurla

महत्त्वाच्या बातम्या