WATCH : रँचोने चक्क बनविली इलेक्ट्रॉनिक बाईक पाच रुपये खर्चात ५० किलोमीटर प्रवास


विशेष प्रतिनिधी

यवतमाळ : नेर तालुक्यातील ब्राम्हणवाडा या गावातील रँचोने भंगारातील सायकल उपयोगात आणली. केवळ १७ ते १८ हजार रुपये खर्च करून पाच रुपये खर्चांत ५० किलोमीटर चालणारी इलेक्ट्रॉनिक बाईक बनविली आहे.Rancho made a chuck Electronic bike

हिमांशू सुनील घावडे, असे त्याचे नाव असून, तो पॉलिटेक्निक इलेक्ट्रॉनिक शाखेचा विद्यार्थी आहे. लहानपणापासून काही तरी वेगळे करण्याची आवड आहे. काही दिवसांपूर्वी त्याने घरात भंगारात ठेवून असलेली सायकल काढली. पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भीडत असल्याने दुचाकी चालवणे अनेकांना परवडत नाही.



त्यामुळे कमी खर्चात प्रवास करता येईल, अशी बाईक बनविण्याचा विचार त्याच्या डोक्यात आला. खाऊसाठी म्हणून जमा केलेल्या पैशातून त्याने वस्तूची खरेदी करून इलेक्ट्रॉनिक बाईक बनविली. साडेचार तासात बॅटरी चार्ज झाल्यावर पन्नास किलोमीटर पर्यंत चालते.

चार्जिंगसाठी केवळ पाच रुपयाचे युनिट जळते. या बाईकचा वापर तो नेर शहरात जाण्यासाठी करतो. तीन क्विंटल वजन ओढण्याची क्षमता या बाइकमध्ये आहे. नवीन सायकल मिळाल्यास यापेक्षा सुधारीत वाहन निर्मिती करण्याचा हिमांशूचा ध्यास आहे.

  • ब्राम्हणवाडात चक्क बनविली इलेक्ट्रॉनिक बाईक
  • हिमांशू सुनील घावडे, असे त्याचे नाव आहे
  • भंगारातील सायकलचा केला कायापालट
  • खाऊसाठीच्या पैशातून वस्तूची खरेदी
  • साडेचार तासात बॅटरी चार्ज होते.
  • सायकल धावते एका दमात ५० किलोमीटर

Rancho made a chuck Electronic bike

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात