रामराजे नाईक निंबाळकरांची अचानक प्रकृती बिघडली; रुग्णालयात केले दाखल


रात्री अचानकपणे ताप वाढल्याने त्यांना पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.Ramraje Naik Nimbalkar’s health suddenly deteriorated; Hospitalized


विशेष प्रतिनिधी

सातारा : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची प्रकृती अचानक बिघडल्याने सोमवारी मध्यरात्री त्यांना पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.साताऱ्यात झालेल्या जिल्हा बँकेच्या बैठकीसाठी देखील रामराजे उपस्थित होते.

प्रकृती अस्वस्थतेमुळे उपचारासाठी दाखल केल्याचे निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.आज मंगळवारी सकाळपर्यंत रामराजेंना बरे वाटू लागले असून सायंकाळपर्यंत घरी सोडतील, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.साेमवारी खासदार उदयनराजे भोसले यांनी फलटण येथे जाऊन रामराजे नाईक निंबाळकर यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी दाेघांमध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अनुषंगाने बैठक झाली हाेती.

जिल्हा मध्यवर्ती बँकेत राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलचे उमेदवार ठरविण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. दरम्यान मंगळवारी होणाऱ्या या बैठकीत अंतिम निर्णय होईल, जागावाटप देखील करायचे आहे. याबाबतचा निर्णय घेण्यात येणार होता; परंतु रामराजे हॉस्पिटलमध्ये असल्याने या बैठकीत निर्णय होईल का नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

Ramraje Naik Nimbalkar’s health suddenly deteriorated; Hospitalized

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था