यांच्या बायकोने मारलं तरी म्हणतील मोदीजीच जबाबदार, देवेंद्र फडणवीस यांची महाविकास आघाडीवर टीका

स्वत: काही करायचं नाही. मराठा आरक्षण घालवलं. ओबीसी आरक्षण घालवलं. सगळ्या घटकांना जमीनदोस्त करायचं आणि मोदीजींनी केलं, मोदींमुळे झालं म्हणायचं. म्हणूनच म्हणालो, यांच्या बायकोनं मारलं तरी म्हणतील मोदीजीच जबाबदार आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.Ram will not sit idly by while Hanumana is being politically assassinated, Chirag Paswan’s direct confrontation with Prime Minister Narendra Modi


विशेष प्रतिनिधी

नागपूर : स्वत: काही करायचं नाही. मराठा आरक्षण घालवलं. ओबीसी आरक्षण घालवलं. सगळ्या घटकांना जमीनदोस्त करायचं आणि मोदीजींनी केलं, मोदींमुळे झालं म्हणायचं. म्हणूनच म्हणालो, यांच्या बायकोनं मारलं तरी म्हणतील मोदीजीच जबाबदार आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

नागपुरात देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनात सहभागी होत महाविकास आघाडी सरकारवर आरक्षणाच्या मुद्द्यावरून हल्लाबोल केला. आंदोलनात कार्यकर्त्यांशी बोलताना फडणवीस यांनी ठाकरे सरकारचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले, भाजपा हजारो कार्यकर्ते ओबीसींच्या हक्कां करिता रस्त्यावर उतरले आहेत.



माझा विश्वास आहे की, एक तर सरकारला ओबीसींचं आरक्षण पुन्हा द्यावं लागेल, नाहीतर खुर्ची खाली करावी लागेल. बावनकुळे म्हणतात ते खरंय. हे आरक्षण राजकीय षडयंत्रामुळे गेलंय. आणि हे किती नाटकबाज आहेत. कालपासून नवीन सूर सुरू झाला. मोदीजींनी डेटा दिला नाही. मी चॅलेंज देऊन सांगतो.

सत्तेत असलेल्या पक्षांच्या नेत्यांना खुलं चॅलेंज देतो. कुठल्या डेटाच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण द्यायला सांगितलं आहे. हा जनगणनेचा डेटा नाहीये. तो इम्पिरिकल डेटा आहे आणि तो राज्य मागासवर्ग आयोगाला जमा करायचा आहे. पण, या सरकारचं एक मस्त आहे. एकमेकांचे लचके तोडत आहेत.

पण, सत्तेचे लचके तोडताना तिघंही एकत्र आहेत. जिथे धडपडले. जिथे नापास झाले. तिथे एकाच सुरात बोलतात हे मोदीजींनी केलं. मोदीजींनी केलं पाहिजे. मला तर असं वाटतं की, एखाद्या दिवशी यांच्या बायकोनं मारलं, तर त्यासाठीही मोदीजींनाच जबाबदार ठरवतील, अशी परिस्थिती यांची झाली आहे.

काँग्रेस ओबीसी आरक्षणाचे खरी मारेकरी.

फडणवीस म्हणाले, ये पब्लिक है, ये सब जानती है. ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी कोण? तुम्ही सगळ्यांनी लिहून घ्या? ओबीसी आरक्षणाची जी याचिका दाखल झाली, ज्या याचिकेमुळे हा निकाल आला, ही याचिका दोन जणांनी दाखल केली होती. पहिला व्यक्ती म्हणजे वाशिममधल्या काँग्रेस आमदाराचा मुलगा आणि दुसरा व्यक्ती भंडारा जिल्हा परिषदेचा काँग्रेसचा अध्यक्ष. काँग्रेस ओबीसी आरक्षणाची खरी मारेकरी आहे.

Ram will not sit idly by while Hanumana is being politically assassinated, Chirag Paswan’s direct confrontation with Prime Minister Narendra Modi

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात