मराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांकडून पुरेशी दखल नाही; पैसे दिलेत मागच्या सरकारने, सध्याचे अधिकारी फसवतात; खासदार संभाजीराजेंचा हल्लाबोल

प्रतिनिधी

मुंबई – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार गंभीर नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले. पण त्यावर राज्य सरकारने पाठवलेले पत्र हे अधिकाऱ्यांनी लिहून पाठवलेय. फक्त पाठवायचे म्हणून हे लेखी उत्तर पाठवले आहे. मुख्यमंत्र्यांनी त्या पत्राची पुरेशी दखल घेतली नाही, अशा शब्दांत खासदार संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केला आहे. एवढेच नव्हे, तर राज्य सरकारचे अधिकारी फसवत असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे. Rajy Sabha MP Sambhaji Raje targets CM Uddhav Thackeray and state govt officials over maratha reservation issue

खासदार संभाजीराजे यांच्या नांदेडमधल्या सभेला मोठी गर्दी झाली होती. त्याचा संदर्भ घेत संभाजीराजे मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे.ते म्हणाले की मराठा आरक्षणावर आवाज उठवायचा म्हटला, तर मी ते करू शकतो. आम्ही न बोलवता किंवा सांगता देखील नांदेडला ५० ते ७० हजार लोक हजर होते. रायगडसारख्या ठिकाणी आम्ही सुरुवात करू. जर सरकार दखल घेत नसेल आणि आम्ही करायचेच असेल तर करू शकतो. नांदेड ही फक्त एक झलक होती. तीही न सांगता. सांगून बघू का? मग बघा, असे संभाजीराजे म्हणाले.

  • अधिकारी फसवतात

राज्य सरकारने आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या बाबतीत म्हटले होते की १८८५ कोटी रुपयांचा निधी वाटला. हे अधिकारी लोक एवढे फसवतात. हे पैसे सरकारने दिलेले नसून बँकांनी दिलेले आहेत. हे मागच्या फडणवीस सरकारने केले आहे. या सरकारच्या काळात तुम्ही किती दिले हे अधिकाऱ्यांनी सांगावे. आत्ता जाहीर केलेत साडेबारा कोटी रुपये. जे पूर्वीच्या सरकारने केले, त्यापुढे आत्ताच्या सरकारने काहीही केलेले नाही, हे संभाजीराजे यांनी लक्षात आणून दिले.

Rajy Sabha MP Sambhaji Raje targets CM Uddhav Thackeray and state govt officials over maratha reservation issue

महत्त्वाच्या बातम्या