प्रतिनिधी
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे महाविकास आघाडी सरकारवर नाराज आहेत. याच नाराजीतून राजू शेट्टी महाविकास आघाडीला राम राम करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राजू शेट्टी यांना एक सल्ला दिल्याची बातमी समोर आली आहे.Raju Shetty’s original displeasure with NCP sanjay raut
राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून केंद्र सरकारविरोधात आंदोलन करावे, असा अप्रत्यक्ष सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे. राजू शेट्टी हे शेतकर्यांचे नेते आहेत, त्यांचेही काही प्रश्न असतात. यासाठी त्यांनी दिल्लीत जाऊन जंतरमंतर येथे आंदोलन करावे, आम्ही देखील त्या आंदोलनात सहभागी होऊ, कारण शेतकऱ्यांच्या संदर्भात काही धोरणे ही केंद्र सरकारची असतात. त्यामुळे त्यांनी जर असे आंदोलन केले तर आम्ही देखील त्यांच्या पाठीशी राहू. राजू शेट्टी हे झुंजार नेते आहेत, लढवय्ये नेते आहेत, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते प्रामाणिकपणे लढत असतात असेही राऊत म्हणाले.
– मूळ नाराजी राष्ट्रवादीवर
पण मूळात राजू शेट्टी यांची नाराजी राष्ट्रवादीवर आहे. राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेचे आमदारकीचे आश्वासन दिले होते. ते प्रत्यक्षात अजून राष्ट्रवादीने पूर्ण केलेले नाही. म्हणून राजू शेट्टी महाविकास आघाडीच्या विरोधात बोलत आहेत. पण संजय राऊत शिवसेनेचे प्रवक्ते असताना देखील राजू शेट्टींना राष्ट्रवादीच्या वतीने केंद्र सरकार विरोधात लढायचा सल्ला देत असल्याचे दिसत आहे.
– राजू शेट्टींना निर्णय प्रक्रियेत स्थान नाही
कोल्हापुरात येत्या ५ एप्रिल रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारिणीची बैठक होत असून त्यामध्ये याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपची साथ सोडत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. सरकारला दोन वर्षे झाली तरी संघटनेला निर्णय प्रक्रियेत कुठेच स्थान दिले जात नसल्याने माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह संघटनेचे सर्वच नेते नाराज आहेत.
– शेतकऱ्यांसाठी मागण्या
वीज पुरवठा, महापूर नुकसान भरपाई, पीक विमा, प्रोत्साहन अनुदान यासह काही मागण्या संघटनेने सरकारकडे केल्या. पण त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी वाढत असल्याने राजू शेट्टी यांच्याकडून महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले जात असल्याचे सांगितले जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App