Rajeev Satav Death : राजीव सातव हे उभरतं नेतृत्व,मी संसदेतील चांगला मित्र गमावला : पंतप्रधान नरेंद्र मोदी


  • कोरोनाचा संसर्ग झाल्याने गेल्या 23 दिवसांपासून पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या राजीव सातव यांची झुंज आज अखेर संपली. आज पहाटे 5 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. सातव यांच्या अचानक जाण्यामुळे राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.

  • राजीव सातव हे उभरतं नेतृत्व होतं. त्यांच्या जाण्याने मी संसदेतील चांगला मित्र गमावला, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहिली.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली  : राजीव सातव हे उभरतं नेतृत्व होतं. त्यांच्या जाण्याने मी संसदेतील चांगला मित्र गमावला, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहिली. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे आज  कोरोना संसर्गनंतर उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे .Rajeev Satav Death: Rajiv Satav is an emerging leader, I lost a good friend in Parliament: Prime Minister Narendra Modi

राजीव सातव यांच्या जाण्यानं संसदेतील माझा मित्र गमावला. राजीव सातव हे उभरतं नेतृत्त्व होतं. त्यांच्या कुटुंबीय, मित्र, समर्थक यांच्यांप्रती संवदेना व्यक्त करतो, असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

महाराष्ट्राची मोठी हानी: नितीन गडकरी

युवा नेते आणि खासदार राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतीव दुःख झाले. राजीवजी यांनी अतिशय कमी वयात देशाच्या राजकारणावर पाडलेली छाप कौतुकास्पद होती. त्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला : फडणवीस

काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे. तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या कठीण प्रसंगी हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना प्राप्त होवो, ही प्रार्थना करतो!, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे

तेजस्वी भविष्य असलेला नेता गमावला : विजया रहाटकर

तरुण आणि उमद्या स्वभावाचे खासदार राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्र व काँग्रेसने तेजस्वी भविष्य असलेला नेता गमावला आहे. त्यांच्या कुटुंबावरील आघाताची कल्पनाही करवत नाही.

प्रतिभाशाली नेत्याला मुकलो: प्रियंका गांधी

राजीव सातव यांच्या रुपाने आम्ही एका प्रतिभाशाली नेत्याला मुकलो आहोत. ते निर्मळ मनाचे, प्रामाणिक आणि काँग्रेसच्या आदर्शाशी कटिबद्ध असलेले आणि भारतीय जनतेला समर्पित असलेले नेते होते. माझ्याकडे शब्दच नाहीत. त्यांची पत्नी आणि मुलांना त्यांच्याशिवाय पुढे जाण्याची शक्ती मिळो.

मित्राला गमावले: राहुल गांधी

“मी माझ्या मित्राला गमावले. राजीव सातव यांच्या निधनामुळे मी फार दु:खी आहे. ते कॉंग्रेसच्या आदर्शांना प्रत्यक्षात उतरवणारे एक नेते होते. त्यांच्याकडे प्रचंड क्षमता होती. त्यांचे जाणे हे आपल्या सर्वांसाठी फार मोठे नुकसान आहे. मी त्यांच्या कुटुंबियांप्रती संवदेना व्यक्त करतो,” असे ट्वीट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे.

चांगलं व्यक्तिमत्व गमावलं :छत्रपती संभाजीराजे भोसले

माझे राज्यसभेतील सहकारी आणि चांगले व्यक्तीमत्व राजीव सातव यांचे दुखःद निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या कठीण प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबासमवेत संवेदना व्यक्त करतो. आपण कोविड-१९ला गांभीर्याने घेऊन खबरदारी घेणं आवश्यक आहे. हीच त्यांना श्रद्धांजली असेल, असं खासदार संभाजी छत्रपती यांनी म्हटलं आहे.

परम मित्र गमावल्याचे दु:ख कायम राहील: धनंजय मुंडे

जमिनीशी घट्ट नाते जोडलेले युवा नेतृत्व म्हणून अत्यंत कमी वेळेत आपली स्वतंत्र यशोगाथा निर्माण केलेले माझे मित्र खासदार राजीव सातव यांच्या अकाली निधनाने व्यथित झालो आहे. एक तडफदार युवा नेतृत्व आणि एक परममित्र गमावल्याचे दुःख कायम मनात राहील, अशी भावना व्यक्त करतानाच हिंगोली जिल्ह्यातील एका शहीद सैनिक पत्नीला सामाजिक न्याय विभागाच्या योजनेतून जमीन मिळावी यासाठी माझ्याशी संपर्क करून पाठपुरावा केला. त्यांच्या आग्रहास्तव विशेष बाब म्हणून त्या शहीद सैनिक पत्नीला आम्ही मदत केली. सामान्य माणसाच्या कामाची कणव राजीव सातवांच्या कामातून दिसत असे, अशी आठवणही राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितली.

गेल्या 23 दिवसांपासून सातव व्हेंटिलेटरवर होते. मुंबईतील डॉक्टरांची टीमही सातव यांच्यावर उपचार करण्यासाठी येऊन गेली. याशिवाय काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही पुण्यातील रुग्णालयात जाऊन विचारपूस केली होती.

Rajeev Satav Death: Rajiv Satav is an emerging leader, I lost a good friend in Parliament: Prime Minister Narendra Modi

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात