विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राजीव सातव हे उभरतं नेतृत्व होतं. त्यांच्या जाण्याने मी संसदेतील चांगला मित्र गमावला, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहिली. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे आज कोरोना संसर्गनंतर उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे .Rajeev Satav Death: Rajiv Satav is an emerging leader, I lost a good friend in Parliament: Prime Minister Narendra Modi
राजीव सातव यांच्या जाण्यानं संसदेतील माझा मित्र गमावला. राजीव सातव हे उभरतं नेतृत्त्व होतं. त्यांच्या कुटुंबीय, मित्र, समर्थक यांच्यांप्रती संवदेना व्यक्त करतो, असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
Anguished by the passing away of my friend from Parliament, Shri Rajeev Satav Ji. He was an upcoming leader with much potential. Condolences to his family, friends and supporters. Om Shanti. — Narendra Modi (@narendramodi) May 16, 2021
Anguished by the passing away of my friend from Parliament, Shri Rajeev Satav Ji. He was an upcoming leader with much potential. Condolences to his family, friends and supporters. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) May 16, 2021
महाराष्ट्राची मोठी हानी: नितीन गडकरी
युवा नेते आणि खासदार राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतीव दुःख झाले. राजीवजी यांनी अतिशय कमी वयात देशाच्या राजकारणावर पाडलेली छाप कौतुकास्पद होती. त्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
युवा नेते आणि खासदार राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतीव दुःख झाले. राजीवजी यांनी अतिशय कमी वयात देशाच्या राजकारणावर पाडलेली छाप कौतुकास्पद होती. त्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. — Nitin Gadkari (मोदी का परिवार) (@nitin_gadkari) May 16, 2021
युवा नेते आणि खासदार राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतीव दुःख झाले. राजीवजी यांनी अतिशय कमी वयात देशाच्या राजकारणावर पाडलेली छाप कौतुकास्पद होती. त्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे.
— Nitin Gadkari (मोदी का परिवार) (@nitin_gadkari) May 16, 2021
अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला : फडणवीस
काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे. तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या कठीण प्रसंगी हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना प्राप्त होवो, ही प्रार्थना करतो!, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे
काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे.तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏या कठीण प्रसंगी हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना प्राप्त होवो, ही प्रार्थना करतो!ॐ शान्ति — Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) May 16, 2021
काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे.तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏या कठीण प्रसंगी हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना प्राप्त होवो, ही प्रार्थना करतो!ॐ शान्ति
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) May 16, 2021
तेजस्वी भविष्य असलेला नेता गमावला : विजया रहाटकर
तरुण आणि उमद्या स्वभावाचे खासदार राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्र व काँग्रेसने तेजस्वी भविष्य असलेला नेता गमावला आहे. त्यांच्या कुटुंबावरील आघाताची कल्पनाही करवत नाही.
तरुण आणि उमद्या स्वभावाचे खासदार राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्र व काँग्रेसने तेजस्वी भविष्य असलेला नेता गमावला आहे. त्यांच्या कुटुंबावरील आघाताची कल्पनाही करवत नाही. Maharashtra & Cong today lost a young MP Rajiv Satav, a leader with bright future. Om shanti Shanti! pic.twitter.com/xp5Z9fvlQa — Vijaya Rahatkar (मोदी जी का परिवार) (@VijayaRahatkar) May 16, 2021
Maharashtra & Cong today lost a young MP Rajiv Satav, a leader with bright future.
Om shanti Shanti! pic.twitter.com/xp5Z9fvlQa
— Vijaya Rahatkar (मोदी जी का परिवार) (@VijayaRahatkar) May 16, 2021
प्रतिभाशाली नेत्याला मुकलो: प्रियंका गांधी
राजीव सातव यांच्या रुपाने आम्ही एका प्रतिभाशाली नेत्याला मुकलो आहोत. ते निर्मळ मनाचे, प्रामाणिक आणि काँग्रेसच्या आदर्शाशी कटिबद्ध असलेले आणि भारतीय जनतेला समर्पित असलेले नेते होते. माझ्याकडे शब्दच नाहीत. त्यांची पत्नी आणि मुलांना त्यांच्याशिवाय पुढे जाण्याची शक्ती मिळो.
In Rajeev Satav we have lost one of our brightest colleagues. Clean of heart, sincere, deeply committed to the ideals of the Congress & devoted to the people of India. I have no words, just prayers for his young wife & children. May they have the strength to carry on without him pic.twitter.com/Z1q6UPmkbK — Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) May 16, 2021
In Rajeev Satav we have lost one of our brightest colleagues. Clean of heart, sincere, deeply committed to the ideals of the Congress & devoted to the people of India.
I have no words, just prayers for his young wife & children. May they have the strength to carry on without him pic.twitter.com/Z1q6UPmkbK
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) May 16, 2021
मित्राला गमावले: राहुल गांधी
“मी माझ्या मित्राला गमावले. राजीव सातव यांच्या निधनामुळे मी फार दु:खी आहे. ते कॉंग्रेसच्या आदर्शांना प्रत्यक्षात उतरवणारे एक नेते होते. त्यांच्याकडे प्रचंड क्षमता होती. त्यांचे जाणे हे आपल्या सर्वांसाठी फार मोठे नुकसान आहे. मी त्यांच्या कुटुंबियांप्रती संवदेना व्यक्त करतो,” असे ट्वीट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे.
चांगलं व्यक्तिमत्व गमावलं :छत्रपती संभाजीराजे भोसले
माझे राज्यसभेतील सहकारी आणि चांगले व्यक्तीमत्व राजीव सातव यांचे दुखःद निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या कठीण प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबासमवेत संवेदना व्यक्त करतो. आपण कोविड-१९ला गांभीर्याने घेऊन खबरदारी घेणं आवश्यक आहे. हीच त्यांना श्रद्धांजली असेल, असं खासदार संभाजी छत्रपती यांनी म्हटलं आहे.
परम मित्र गमावल्याचे दु:ख कायम राहील: धनंजय मुंडे
जमिनीशी घट्ट नाते जोडलेले युवा नेतृत्व म्हणून अत्यंत कमी वेळेत आपली स्वतंत्र यशोगाथा निर्माण केलेले माझे मित्र खासदार राजीव सातव यांच्या अकाली निधनाने व्यथित झालो आहे. एक तडफदार युवा नेतृत्व आणि एक परममित्र गमावल्याचे दुःख कायम मनात राहील, अशी भावना व्यक्त करतानाच हिंगोली जिल्ह्यातील एका शहीद सैनिक पत्नीला सामाजिक न्याय विभागाच्या योजनेतून जमीन मिळावी यासाठी माझ्याशी संपर्क करून पाठपुरावा केला. त्यांच्या आग्रहास्तव विशेष बाब म्हणून त्या शहीद सैनिक पत्नीला आम्ही मदत केली. सामान्य माणसाच्या कामाची कणव राजीव सातवांच्या कामातून दिसत असे, अशी आठवणही राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितली.
जमिनीशी घट्ट नाते जोडलेले युवा नेतृत्व म्हणून अत्यंत कमी वेळेत आपली स्वतंत्र यशोगाथा निर्माण केलेले माझे मित्र खा. राजीव सातव यांच्या अकाली निधनाने व्यथित झालो आहे. एक तडफदार युवा नेतृत्व आणि एक परममित्र गमावल्याचे दुःख कायम मनात राहील. भावपूर्ण श्रद्धांजली. (1/2)#RajeevSatav pic.twitter.com/NRs7djd2Lv — Dhananjay Munde (@dhananjay_munde) May 16, 2021
जमिनीशी घट्ट नाते जोडलेले युवा नेतृत्व म्हणून अत्यंत कमी वेळेत आपली स्वतंत्र यशोगाथा निर्माण केलेले माझे मित्र खा. राजीव सातव यांच्या अकाली निधनाने व्यथित झालो आहे. एक तडफदार युवा नेतृत्व आणि एक परममित्र गमावल्याचे दुःख कायम मनात राहील. भावपूर्ण श्रद्धांजली. (1/2)#RajeevSatav pic.twitter.com/NRs7djd2Lv
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) May 16, 2021
गेल्या 23 दिवसांपासून सातव व्हेंटिलेटरवर होते. मुंबईतील डॉक्टरांची टीमही सातव यांच्यावर उपचार करण्यासाठी येऊन गेली. याशिवाय काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही पुण्यातील रुग्णालयात जाऊन विचारपूस केली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App