विशेष प्रतिनिधी
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली होती. राज यांच्यासोबत त्यांच्या आईलादेखील कोरोनाची लागण झाली . राज यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं . आता रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर राज ठाकरे यांनी कृष्णकुंज बाहेर येत कार्यकर्त्यांचे अभिवादन स्विकारले.Raj Thackeray’s greetings to the workers coming out of Krishnakunj
राज ठाकरेंना मागील काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. राज ठाकरेंचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले होते.
राज ठाकरे विनामास्क अनेकदा कार्यक्रमांमध्ये दिसून येत होते. कोरोनानंतरदेखील राज ठाकरे कार्यकर्त्यांना भेटायला विनामास्कच गेले असल्याचे दिसून आले.
मागे राज ठाकरे यांची तब्येत बरी नसल्यामुळे आगामी महापालिका निवडणुकींनिमित्त मनसेचा पुणे-मुंबईत होणारा कार्यकर्त्यांचा मेळावादेखील पुढे ढकलण्याच आला होता. त्यामुळे आता अनेक दिवसांनी राज ठाकरेंना कार्यकर्त्यांची भेट घेता आली.
राज ठाकरेंनी कोरोनावर मात केल्याने त्यांना भेटण्यासाठी अनेक कार्यकर्ते कृष्णकुंजच्या बाहेर दिसून आले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App