प्रतिनिधी
संभाजीनगर : 1 मे महाराष्ट्र दिनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची तोफ शिवसेने विरुद्ध धडाडणार असल्याचे पाहून संभाजीनगरचे एआयएमचे खासदार इम्तियाज जलील भलतेच खूश झाले आहेत. त्यांनी राज ठाकरे यांना सभेपूर्वी इफ्तार पार्टीला येण्याचे निमंत्रण देऊन टाकले आहे.Raj Thackeray: Imtiaz Jalil happy to fire guns against Shiv Sena in Sambhajinagar; Invitation to Rajna Iftar
इमतियाज जलील यांनी आज संभाजीनगर च्या पोलीस लोकांची भेट घेतली आणि राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना इमतियाज जलील म्हणाले, राज ठाकरे यांना जे काही राजकारण करायचे ते जरूर करावे. परंतु सर्व धर्मियांना त्यांचे सण आनंदाने साजरे करु द्यावेत. संभाजीनगरच्या सभेपूर्वी त्यांनी आमच्या इफ्तार पार्टीला यावे, असे मी त्यांना निमंत्रण देतो.
इमतियाज जलील यांनी जरी कायदा आणि सुव्यवस्था या मुद्द्यावर पोलीस प्रमुखांची भेट घेतली असली तरी राज ठाकरे यांची तोफ प्रमुख्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी वर धडाडणार असल्याने ते खुश आहेत. इमतियाज जलील यांचा मुख्य प्रतिस्पर्धी पक्ष शिवसेना आहे. शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा पराभव करून ते लोकसभेत पोहोचले आहेत. त्यामुळे आपल्या शत्रूवर त्याचा दुसरा शत्रू जर परस्पर तोफा डागत असेल तर लाभ आपलाच आहे, हे इमतीयाज जलील ओळखून आहेत…!! त्यामुळेच आता “राजसभेच्या रणांगणात” पाऊल टाकत त्यांनी राज ठाकरे यांना इफ्तार पार्टीचे निमंत्रण देऊन टाकले आहे.
राज ठाकरे यांच्या संभाजीनगरच्या सभेला रिपब्लिकन संघटनेने तसेच वंचित बहुजन आघाडी आणि भीम आर्मीने विरोध केला आहे. काही मुस्लीम संघटनांचा देखील राजसभेला विरोध आहे. परंतु, आता पोलिसांच्या परवानगीने सभा होणारच असल्याने विरोध करणाऱ्या संघटनांनी वेगवेगळे पवित्रे घ्यायला सुरुवात केली आहे. इम्तियाज जलील यांचे राज ठाकरे यांना इफ्ताल पार्टीला निमंत्रण देणे हा देखील असाच एक वेगळा राजकीय पवित्रा असल्याचे मानले जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App