प्रतिनिधी
रत्नागिरी : दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे पक्षाच्या अध्यक्षपदाच्या दिलेला राजीनामा परत घेतला. चार दिवस चाललेल्या राजीनामा नाट्यावर भाष्य करताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी, शरद पवार यांना खरोखरीच पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायचा होता, पण त्यानंतर अजित पवार ज्या प्रकारे वागत होते, ते पाहून शरद पवारांनी कदाचित निर्णय बदलला असेल, असा दावा केला. ते रत्नागिरीत जाहीर सभेत बोलत होते. Raj Thackeray claims sharad Pawar wanted to retire but ajit Pawar’s behaviour prevented him to do so
काय म्हणाले राज ठाकरे?
मागे कोकणात आलो होतो. सभा सगळ्याच ठिकाणी करायचे ठरवले पहिल्यांदा रत्नागिरी निवडले. बरेच विषय तुंबलेत, नालेसफाई होणं गरजेचं आहे. संपूर्ण राज्याची राजकीय परिस्थिती काही वर्ष समजेनाशी झाली. आमदार समोर आले की सध्या कुठाय असं विचारावं लागतं, असे राज ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी बारसूसह मुंबई गोवा महामार्गासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
यावेळी त्यांनी शरद पवारांच्या राजीनाम्यावरही भाष्य केलं. “दुसरीकडे राजीनाम्याचा विषय सुरू होता तो काल संपला. त्यांना खरंच राजीनामा द्यायचा होता असं मला वाटतं. त्यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार ज्याप्रकारे वागले ते पवारांच्या डोळ्यादेखत होत असताना मी आता राजीनामा दिला हे असं वागतायत. उद्या ते जसं बोलत होते तसं मलाही सांगतील या भीतीपोटी त्यांनी राजीनामा मागे घेतला असावा. होतंय ते बरं होतंय अशा उकळ्या फुटत होत्या. पण तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App