पहिला पाऊस अनुभवण्याची प्रत्येकाची वेगळी त-हा असते. पावसाचा असाच काहीशा वेगळा रंगढंग दाखवणाऱ्या ‘येरे येरे पावसा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन शफक खान यांनी केले आहे.
टोरंटो, कॅनडा आणि टोकियो (जपान) आदि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यशाच्या आणि पुरस्कारांच्या सरी झेलणारा हा चित्रपट आता जीफोनी महोत्सव गाजवायला सज्ज Rain from Maharashtra to rain in Italy: ‘Yere Yere Pavasa’ selected for 51st Gifoni Film Festival in Italy
विशेष प्रतिनिधी
मुंबई : अख्या महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला असताना, ‘येरे येरे पावसा’ हा आगामी मराठी चित्रपटही विविध परदेशी चित्रपट महोत्सवात तुफान गाजतोय. इटलीच्या ५१व्या ‘जीफोनी’ चित्रपट महोत्सवासाठी ‘येरे येरे पावसा’ या चित्रपटाची निवड झाली आहे. टोरंटो, कॅनडा आणि टोकियो (जपान) आदि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यशाच्या आणि पुरस्कारांच्या सरी झेलणारा हा चित्रपट आता जीफोनी महोत्सव गाजवायला सज्ज झाला आहे. एलिमेंट ६ या विभागात या चित्रपटाची निवड झाली आहे. महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे ६ ते ९ या वयोगटातील ८०० मुलं या महोत्सवाचे परिक्षक असणार आहेत. इटलीमध्ये या चित्रपटाचे स्क्रीनिंग नुकतेच संपन्न झाले. त्यानंतर झूम मिटिंगद्वारे दिग्दर्शक शफक खान यांच्यासोबत प्रश्न उत्तरांचे सेशन झाले.
‘येरे येरे पावसा’ चित्रपटाच्या माध्यमातून बोधप्रद गोष्ट सांगण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी झाल्याची ही पावतीच असल्याचे ही त्या आवर्जून नमूद करतात.या चित्रपटाची निर्मिती शारीक खान तर सहनिर्मिती अँन्या झँग (बटरफ्लाय फिल्म्स) यांची आहे. सत्या शेट्टी, ग्यानचंद चौहान, सुमेध गायकवाड कार्यकारी निर्माते आहेत. ‘एस.क्यूब फिल्म्स इंडिया एलएलपी’ यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन शफक खान यांनी केले आहे. चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी योगेश एम.कोळी यांनी सांभाळली असून संकलन चंदन अरोरा यांनी केले आहे. कथा भूषण दळवी तर पटकथा शफक खान, भूषण दळवी यांची आहे. संवाद अभिषेक करगुटकर, विनोद जाधव यांनी लिहिले आहेत.
अमोल पोवळे यांनी लिहिलेल्या गीतांना सुशांत पवार, किशोर पवार यांनी संगीत दिले आहे. अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे. साऊंड चाकीर हुसैन तर कलादिग्दर्शन योगेश इंगळे यांचे आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App