रायगडच्या कार्यक्रमात ठाकरे – पवारांना एकत्र आणून तटकरेंचा शिवसेनेच्या तीन आमदारांना “राजकीय संदेश”!!


प्रतिनिधी

रायगड : रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात राजकीय विस्तव जात नसताना राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एकत्र आणून शिवसेनेच्या तीनही आमदारांना विशिष्ट “राजकीय संदेश” दिला आहे.Raigad District Government College Administrative Building Bhumi Pujan

शिवसेनेचे रायगड जिल्ह्यातले तीन आमदार भरत गोगावले, महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांनी गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांना पालकमंत्री पदावरून हटविण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे लावून धरली आहे. रायगड जिल्ह्यातले शिवसैनिक आणि शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते तसेच शिवसेनेचे तीनही आमदार राष्ट्रवादी काँग्रेस वर प्रचंड नाराज आहेत. त्यांनी उघडपणे पत्रकार परिषद घेऊन आदिती तटकरे यांना पालकमंत्री पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.


महाराष्ट्राच्या मागण्यांवर गृहमंत्री अमित शहा यांचा सकारात्मक प्रतिसाद; खासदार सुनील तटकरे यांची माहिती


 

या पार्श्वभूमीवर खासदार सुनील तटकरे गेल्या काही दिवसांपासून राजकीय दृष्ट्या ऍक्टिव्हेट झाले असून त्यांनी आज रायगड जिल्ह्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने महाविकास आघाडीतल्या काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांचा जणू मेळावाच भरवला होता. व्यासपीठावर पक्षाध्यक्ष शरद पवार आरोग्य मंत्री राजेश टोपे, काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात, अमित देशमुख यांच्यासह पालक मंत्री म्हणून आदिती तटकरे यांना स्थान देण्यात आले होते.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन उपस्थिती लावली. त्यांनी छोटेखानी भाषणही केले. शरद पवार यांचे देखील यावेळी भाषण झाले. या भाषणातला तपशील वगळला तरी आदिती तटकरे यांना पालकमंत्री पदावरून हटविण्याची शिवसेनेच्या तीन आमदारांच्या मागणीच्या पार्श्‍वभूमीवर खासदार सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना एकत्र आणले आणि त्या कार्यक्रमात पालकमंत्री या नात्याने आदिती तटकरे यांना व्यासपीठावर स्थान दिले यातून शिवसेनेच्या तीन आमदारांना “राजकीय संदेश” त्यांनी दिला आहे.

रायगडच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाकरे भावा एकच राहिले असताना आदिती तटकरे यांच्या हटविण्याच्या मागणीवर यापुढे शिवसेनेचे तीन आमदार नेमकी काय भूमिका घेतात? आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना कसा प्रतिसाद देतात?, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Raigad District Government College Administrative Building Bhumi Pujan

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात