पुण्याचे आनंद देशपांडे फोर्ब्सच्या यादीत, १ अब्ज डॉलर्स म्हणजे साडेसात हजार कोटी रुपयांची संपत्ती


विशेष प्रतिनिधी

पुणे : पुण्यातील पर्सिस्टंट सिस्टीम या कंपनीचे संस्थापक अध्यक्ष आनंद देशपांडे यांचा जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत समावेश करण्यात आला. पुण्यातील पहिले टेकबिलीनिअर होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. गेल्या दोन दिवसांत पर्सिस्टंटच्या समभाग मूल्यात (शेअर व्हॅॅल्यूत) झालेल्या वाढीमुळे देशपांडे अब्जाधीश बनले आहेत.Pune’s Anand Deshpande on Forbes list, assrts of 1 billion dollers worth Rs 7,500 crore

देशपांडे यांच्याकडे पर्सिस्टंटचे तीस टक्के शेअर्स आहेत. त्यांची आजची किंमत १ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त म्हणजेच सुमारे साडेसात हजार कोटी रुपये आहे. पूनावाला, कल्याणी, बजाज यांच्यासारखे अब्जाधीश पुण्यात असले तरी हे सर्व उद्योगपती प्रामुख्याने उत्पादन क्षेत्रातले आहेत. टेक्नॉलॉजीमधले पहिले अब्जाधीश पुणेकर देशपांडे ठरले आहेत.



महाविद्यालयीन शिक्षणानंतर अमेरिकेमध्ये चांगल्या नोकरीच्या आशेने गेलेले देशपांडे वयाच्या २८ व्या वर्षी पुन्हा मायदेश परत आले आणि त्यांनी स्वत:चा उद्योग सुरु केला. अमेरिकेमध्ये काम करताना जमवलेले २१ हजार डॉलर्सच्या भांडवलावर त्यांनी उद्योग सुरु केला.

यामध्ये त्यांना त्यांचे वडील दादा देशपांडे यांनीही काही आर्थिक मदत केली आणि पार्सिस्टंट कंपनीची स्थापना झाली. १९९० मध्ये त्यांनी आपल्या कंपनीची स्थापना केली. आज ही कंपनी ५६६ दशलक्ष डॉलर्सची आहे. मार्च २०२१ ला संपलेल्या आर्थिक वर्षात या कंपनीने उत्पन्नात १३ टक्के वाढ केली.

कंपनीचा निव्वळ नफा ३८ टक्क्यांनी वाढून ६२ दशलक्ष डॉलर्सवर गेला. पर्सिस्टंटच्या एकूण व्यवसायातील ८० टक्के वार्षिक महसूल अमेरिकेतून येतो. उर्वरीत वीस टक्के युरोपीय देश आणि भारतातून येतो. पर्सिस्टंटमध्ये आज ४५ देशांमधले १४ हजार तंत्रज्ञ काम करतात.

टीसीएस, इन्फोसिस, विप्रो यांच्याप्रमाणेच जागतिक प्रतिष्ठा मिळवणारी ही लिस्टेड कंपनी आहे. पर्सिस्टंटच्या शेअरमध्ये यंदा १४९ टक्के वाढ झाली आहे. या सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच देशपांडे पुण्यातले पहिले टेक बिलेनियरह् बनले आहेत.

दरम्यान २०१९ मध्ये देशपांडे यांनी कंपनीचे सीईओपद सोडले. ते आता अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी सांभाळतात. फोर्ब्सनुसार आज पर्सिस्टंटचे वार्षिक उत्पन्न हे ५६.५ कोटी डॉलर इतकं आहे.

देशपांडे मूळचे मध्य प्रदेशातील भोपाळ येथील असून त्यांचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले. खरगपूर आयआयटीतून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी १९८९ मध्ये अमेरिकेतून पीएचडी मिळवली. सन नव्वदमध्ये भारतात सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ही संकल्पना सुरू झाल्यानंतर देशपांडे अमेरिकेतून भारतात परतले.

पर्सिस्टंटव्यतिरिक्त स्वत:च्या फाउंडेशनच्या माध्यमातून ते तरुणांना मार्गदर्शन करतात. नुकताच देशपांडे कुटुंबाने पुणे पोलिसांच्या कर्मचाºयांंसाठी ४५० घरे असणारा एक प्रकल्प स्वत:च्या पैशातून उभारुन दिलाय.

Pune’s Anand Deshpande on Forbes list, assrts of 1 billion dollers worth Rs 7,500 crore

महत्त्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात