पुणे : महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण ; ट्विट करत दिली माहिती


पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.त्यांना सौम्य लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी टेस्ट केली.Pune: Mayor Muralidhar Mohol infected with corona; Tweeting information


विशेष प्रतिनिधी

पुणे : दिवसेंदिवस कोरोना वाढतच चालला आहे.सध्या पुणे शहरात 44 हजार 452रुग्ण सक्रिय आहेत. तर आतापर्यंत शहरात एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 9 हजार 209 झाली आहे.अशातच शहरातील पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.त्यांना सौम्य लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी टेस्ट केली.दरम्यान टेस्ट केल्यावर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मोहोळ यांनी ट्विट करून दिली आहे.महापौर म्हणाले की , ” कोरोनाची काहीशी लक्षणे जाणवल्यावर RT-PCR चाचणी केली असता माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती स्थिर असून संपर्कात आलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी करुन घ्यावी.तसेच आपल्या सगळ्यांच्या सदिच्छांच्या पाठबळावर लवकरच बरा होऊन आपल्या सेवेत असेन.”अशी माहिती त्यांनी ट्विटर वरून दिली आहे.

Pune: Mayor Muralidhar Mohol infected with corona; Tweeting information

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय