पुणे विमानतळावर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी युनायटेड अरब अमिरत (युएई) येथून आलेल्या विमानातील एका प्रवाशाच्या ताब्यातून ४८ लाख ६६ हजार रुपये किंमतीचे हिरे जप्त केले आहे. Pune custom department seized 46 lakhs Diamand at pune Airport
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे विमानतळावर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी युनायटेड अरब अमिरत (युएई) येथून आलेल्या विमानातील एका प्रवाशाच्या ताब्यातून ४८ लाख ६६ हजार रुपये किंमतीचे हिरे जप्त केले आहे. याप्रकरणी पुण्यातील काेंढवा भागात राहणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाला कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढील चाैकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
पुण्यातील काेंढवा परिसरात राहणारा सदर युवक जानेवारी महिन्यात युएई मध्ये गेला हाेता. त्याठिकाणी दाेन महिने वास्तव्य केल्यानंतर शारजाहून ताे विमानाद्वारे पुणे विमानतळावर आला. विमानतळावर त्याची हालचाल संशयास्पद आढळून आल्याने कस्टम अधिकाऱ्यांनी त्याला अडवून त्याच्याकडील सामानाची तपासणी केली. त्यावेळी त्याच्या ताब्यातील सामानात पॅकिंग केलेल्या ट्राऊझर्सच्या पाऊच मध्ये लपवून ठेवण्यात आलेले हिरे जप्त करण्यात आले. त्याच्या सामानाची कसून तपासणी केली असता त्यात एकूण ७५ कॅरेट वजनाचे सुमारे तीन हजार हिरे (गाेल चमकदार कट आणि बॅगेटस) सापडल्याची माहिती सीजीएसटी कमिशनर यशाेधन वनगे यांनी दिली आहे.
याप्रकरणी संशयित तरुणावर भारतात हिरे तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सीमाशुल्क कायदा १९६२ नुसार गुन्हा दाखल करण्यात अाला असून त्याच्याकडील हिरे जप्त करण्यात आले आहे.
शारजा येथून भारतात हिरे कॅरिअरचे काम करण्याकरिता त्याचा वापर करण्यात आला हाेता आणि त्याकरिता ठराविक रक्कम माेबदला म्हणून मिळणार हाेती. त्याचे शारजाहून तिकिट काेणीतरी व्यक्तीने काढून दिलेले असून संबंधित हिरे ताे नेमका काेणाला देणार हाेता याबाबत सखाेल तपास करण्यात येत असल्याची माहिती कस्टम विभागाचे अधिकारी धनंजय कदम यांनी दिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App