विशेष प्रतिनिधी
पुणे : देहविक्री करणा-या महिलांच्या खात्यामध्ये ७ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य जमा केले आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती अश्विनी कांबळे यांनी दिली. prostitutes in Pune 7 crore financial assistance deposited in the account
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत सुटका केलेल्या पिडीतांना तसेच वेश्या व्यवसाय करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करणा-या महिलांना ही मदत दिली. पुणे जिल्हयातील बँक खाते असलेल्या 5 हजार 296 महिलांच्या बँक खात्यामध्ये ७ कोटी ९४ लाख ४० हजार रुपये दोन टप्प्यात भरले आहेत.
वेश्या व्यवसायावर अवलंबून असणा-या महिलांना कोरडे अन्नधान्य व रोख आर्थिक सहाय्य या सारख्या मुलभूत सेवा ओळखपत्राची विचारणा न करता पुरविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने २१ सप्टेंबर २०२० रोजी दिले होते.
त्यानुसार जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीमध्ये सदस्य सचिव म्हणून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती अश्विनी कांबळे यांचा समावेश आहे.
निधीचे वाटप असे झाले
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App