संसद भवन परिसरात आंदोलने, निदर्शने आणि धार्मिक विधीस मनाई; काँग्रेसचे टीकास्त्र


प्रतिनिधी

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आता संसद भवन परिसरात निदर्शने, आंदोलने, उपोषण करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच संसद परिसरात कोणतीही धार्मिक कृती करण्यास मनाई करण्यात आली आहे. Prohibition of agitations, demonstrations and religious ceremonies in Parliament premises

मात्र ही बातमी येताच काँग्रेसने मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले असून संसद परिसर म्हणजे मोदींचे घर नाही, असे शरसंधान काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी यांनी सोडले आहे.

लोकसभेच्या सचिवालयाने जाहीर केलेल्या असंसदीय शब्दांच्या यादीवरून आधीच काँग्रेस सह सर्व विरोधी पक्षांनी मोदी सरकारला घेरलेले असतानाच संसद परिसरात आंदोलने, निदर्शने, धार्मिक कृत्य बंदी घातल्याची बातमी आली. त्यावर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

जर विरोधी पक्ष महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वाला अनुसरून अहिंसेच्या मार्गाने आपले काही म्हणणे सांगत असेल, तर त्याला प्रतिबंध कसा काय घालता येऊ शकतो??, संसद परिसर सर्वांसाठी आहे. तेथे भेदभाव होता कामा नये. संसद परिसर म्हणजे मोदींचे खासगी घर नव्हे, अशा शब्दात अधीरंजन चौधरी यांनी सरकारवर टीका केली आहे.

Prohibition of agitations, demonstrations and religious ceremonies in Parliament premises

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात