विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : रामनवमीच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा भागात दोन गटांत तणाव निर्माण झाला होता. पोलिसांच्या कारवाईनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. शहराच्या नामांतराच्या महिनाभरानंतर संभाजीनगरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. रामनवमीच्या पार्श्वभूमी राम मंदिर परिसरात दोन गटात बाचाबाची होऊन अचानक दगडफेक सुरू केली. पाहता पाहता घटनेनं रौद्ररूप धारण केलं. पोलिसांच्या आणि खासगी मिळून 13 गाड्या जाळण्यात आल्या. काही पोलीस जखमी झाल्याचंही वृत्त आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत 12 गोळ्या झाडल्या. अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या आहेत. problem in two groups in Chhatrapati Sambhajinagar
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा भागातील मंदिराच्या परिसरात मध्यरात्री गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. मध्यरात्री एक वाजता ही घटना घडली. पोलीस अधिकाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांच्या आणि खासगी मिळून अशा एकूण 13 गाड्या जाळल्या गेल्या. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या.
गुरुवारी साजरा होणाऱ्या रामनवमीनिमित्त शहरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहराच्या किऱ्हाडपुरातील राम मंदिरात देखील जय्यत तयारी सुरू होती. रात्री बारा वाजेच्या सुमारास काही कारणावरून दोन गटांत वादाची पहिली ठिणगी पेटली. दोन्ही गटात सुरुवातीला बाचाबाची होऊन वाद वाढला आणि शिवीगाळापर्यंत पोहोचला. त्यानंतर हा वाद आणखी पुढे गेला. पुढे दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. आझाद चौक ते सिटी चौकापर्यंत सर्व पोलीस रस्त्यावर होते. सध्या सर्व परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यात काही पोलीसदेखील जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका
छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा परिसरात काही समजकंटकांनी राडा घातला असल्याचे समोर आले आहे. मात्र सध्या सर्व परिस्थिती नियंत्रणात असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस आयुक्त निखिल गुप्ता (Nikhil Gupta) यांनी केले आहे. तसेच पोलिसांकडून कायदा मोडणाऱ्या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचं देखील पोलीस आयुक्त म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App