प्रतिनिधी
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या रविवारच्या पुणे दौऱ्यात विद्यार्थ्यांशी संवाद याच कार्यक्रमावर प्रामुख्याने भर ठेवलेला दिसला. पुणे मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर त्यांनी मेट्रो मधून प्रवास करताना आपल्या बरोबर असलेल्या राजकीय नेत्यांशी नव्हे, तर फक्त शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला.Prime Minister Narendra Modi gave the students of Symbiosis the mantra to work on the theme of development of the country
या शालेय विद्यार्थ्यांमध्ये काही दिव्यांग विद्यार्थ्यांना ही मोदींबरोबर प्रवास करण्याची संधी मिळाली. या सर्व विद्यार्थ्यांना मोदींनी त्यांच्या करिअरविषयी आवडीनिवडी विषयी विचारले. कोण कोणते करिअर करू इच्छित आहे?, त्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी काय काय करता येऊ शकेल?, देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या विषयी काय माहिती आहे?, वगैरे प्रश्न पंतप्रधान मोदींनी या विद्यार्थ्यांना विचारले. या विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांची संवाद साधून आपल्याला खूप आनंद झाल्याचे नंतर अनेक वृत्तवाहिन्यांशी बोलताना सांगितले.
मेट्रोमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधून झाल्यानंतर जरी पंतप्रधानांनी एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभेत भाषण केले असले तरी त्यात देखील त्यांनी भर विकास कामांवर ठेवला होता आणि त्यानंतर सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ हाच या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंबायोसिसच्या शिक्षा विद्यार्थ्यांना देखील पुढची 25 वर्षे विशिष्ट थीमवर काम करण्यास सांगितले. यासाठी पंतप्रधानांनी काही थीमदेखील सुचवल्या. यामध्ये ग्लोबल वार्मिंग, जल आणि वायू प्रदूषण त्याचबरोबर भारतातल्या सीमावर्ती गावांचा विकास अशा सारख्या थीमवर प्रत्येक वर्षी सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
Addressing the Golden Jubilee celebrations of Symbiosis University. https://t.co/FHOLRKkrU9 — Narendra Modi (@narendramodi) March 6, 2022
Addressing the Golden Jubilee celebrations of Symbiosis University. https://t.co/FHOLRKkrU9
— Narendra Modi (@narendramodi) March 6, 2022
सिम्बायोसिस विद्यापीठात शिकणारे 50 हजार विद्यार्थी एका तीनवर विशिष्ट योजनाबद्ध पद्धतीने काम करतील तर ते देशासाठी फार मोठे योगदान ठरेल, असे आत्मविश्वासपूर्ण उद्गार पंतप्रधानांनी काढले. त्याच वेळी मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत या केंद्र सरकारच्या योजनांमध्ये स्वतःहून पुढे येऊन स्टार्टअप सारख्या योजनांमधून उद्योजक बनण्याची प्रेरणा पंतप्रधान मोदींनी यावेळी विद्यार्थ्यांना दिली. आत्मनिर्भर भारतासाठी सध्या एवढा कोणताही अनुकूल काळ कधीही नव्हता कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर युक्रेन सारखी संकटे निर्माण होत असताना भारताला आपल्या शक्तीची खऱ्या अर्थाने जाणीव झाली आहे. या शक्तीचा लाभ विद्यार्थ्यांनी पुढे येऊन घेतला पाहिजे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ जेव्हा 75 वर्षे पूर्ण करेल तेव्हा दरवर्षी एका थीम वर काम करणारे विद्यार्थी अशा देशाच्या विकासाच्या 25 थीमवर वर काम करतील तर ते फार मोठे योगदान फक्त सिंबायोसिस साठी ठरणार नसून संपूर्ण देशासाठी ठरेल, असे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी अशाप्रकारे आपल्या संपूर्ण दौऱ्याचा भर हा प्रामुख्याने विकास कामांवर आणि कोणत्याही वादावरून भाष्य करतात फक्त विद्यार्थ्यांची संवादांवर ठेवल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले.
– वैद्यकीय शिक्षण परवडणारे करा; डॉ. मुजुमदार यांचे पंतप्रधान मोदींना साकडे!!
तत्पूर्वी, सिम्बॉयसिस विद्यापीठाचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वैद्यकीय शिक्षण स्वस्त करण्याचे आणि परवडणारे करण्याचे आवाहन केले. कोल्हापूर जिल्ह्यातल्या हरळी बुद्रुक या छोट्या गावातून येऊन मी स्वप्न पाहिले आणि आज सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा द्रष्टा पंतप्रधान आल्याने माझ्या जीवनाचे सार्थक झाले आहे, असे ते म्हणाले. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांना संबोधून ते म्हणाले, ग्रामीण भागातली आपली लोकप्रियता एवढी आहे की माझ्या हरणी बुद्रुक या छोट्या 2000 वस्तीच्या गावातूनही अनेक जण फक्त आपल्याला बघण्यासाठी येथे आले आहेत…!!
Prime Minister Narendra Modi gave the students of Symbiosis the mantra to work on the theme of development of the country
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App