विशेष प्रतिनिधी
उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील उमेश रघुनाथ खोसे यांना राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. ते उमरगा तालुक्यात कडदोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगदंबानगर येथे कार्यरत आहेत.भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने देशातील ४५ शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर केला.President Teacher Award is declered to Umesh Khose of Osmanabad District
यात महाराष्ट्रातील दोन शिक्षकांची निवड झाली. त्यात मराठवाड्यातील एकमेव शिक्षक म्हणून उमेश रघुनाथ खोसे यांना हा बहुमान मिळाला आहे. यापूर्वीही त्यांना राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार जाहीर झाला . ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी मोबाईलला रेंज नसलेल्या तांड्यावर मुलांना ऑफलाईन शिकता यावे, मनोरंजक अध्ययन करता यावे यासाठी ५१ ऑफलाईन अँप्सची निर्मिती केली. तसेच मुलांच्या सहाय्याने व्हिडिओ निर्मिती करून मुलांना स्वयं अध्ययनाच्या संधी दिल्या आहेत.
तांड्यावरील मुलांना त्यांच्या बंजारा बोली भाषेत पहिलीच पुस्तक अनुवादित करून त्याच भाषेत डिजिटल साहित्य निर्माण केले. बोलीभाषा व तंत्रज्ञान या उपक्रमाची निवड राज्यस्तरावरील शिक्षणाची वारीमध्येही झाली होती. त्यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर रिसर्च पेपर सादरीकरण केले आहेत. त्यांची ५ पुस्तके व ४७ लेख प्रकाशित झालेले आहेत. त्यांनी दीक्षा अँपवर इ कंटेंट तयार केले आहेत.
त्यांनी व त्यांचे मुख्याध्यापक श्रीराम पुजारी यांनी राबविलेल्या शिक्षण संस्कार शिबिर नवोपक्रमास राज्यात प्रसिद्धी मिळाली आहे. त्यांनी राष्ट्रीय एकात्मता वाढीसाठी शाळेत उपक्रम राबविले आहेत .तसेच ग्रामीण भागातील मोलमजुरी करणारे लोकांनी दिलेले योगदान, तसेच ग्रामपंचायत व इतर संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या दोन्ही शाळा डिजिटल आहेत.
टॅब स्कुल करून मुले वेगवेगळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म वापरून आनंददायी शिक्षण घेऊ लागले. मुलांना आनंददायी शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी ऑफलाईन अँप्स, गेम्स, टेस्ट तयार केल्या आहेत. तसेच कोरोनात त्यांची शाळा ऑनलाईन व ऑफलाईन ३६५ दिवस सुरू आहे. मुले दीक्षा अँप तसेच इतर साधनाच्या सहाय्याने नियमित शिक्षण घेत आहेत.
आशा काळात त्यांनी शाळेची स्वतःची वेबसाईट तयार करून दोन्ही वर्षी दहावी बारावी प्रमाणे शाळेचा ऑनलाईन निकाल लावला. ऑनलाईन निकाल लावणारी जिल्ह्यातील एकमेव जिल्हा परिषदेची शाळा आहे. ISO, उपक्रमशील, ACTIVE SCHOOL असलेल्या शाळेतील उपक्रमशील शिक्षक उमेश खोसे यांच्या या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App