विशेष प्रतिनिधी
मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषददेच्या वतीने नुकतीचं निवडणूक घेण्यात आली होती.. त्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून, विक्रमादित्य प्रशांत दामले यांच्या रंगकर्मी पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. त्यामध्ये अभिनेते प्रशांत दामले यांची नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.. त्यांनी नवनाथ कांबळी यांचा पराभव केला आहे..Prashant Damle elected as President of Akhil Bharatiya Marathi Natya Parishad
अनेक आरोप प्रत्यारोप आणि राजकीय हस्तक्षेपामुळे यावेळेसची निवडणूक लक्षवेधी ठरली होती. तर उपाध्यक्षपदी नरेश गढेकर यांची निवड करण्यात आली आहे. खनिजदार पदी सतीश दोडके यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती नाट्य परिषदेच्यावतीनं देण्यात आली आहे.
कार्यकारणी मध्ये 13 पैकी 11 सदस्य निवडून आले आहेत. अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांनी दिली आहे. प्रशांत दामले यांची अध्यक्षपदी निवड झाल्यावर नाट्य क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App