सभेत बोलत असताना प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यावर घणाघाती प्रहार केला.Prakash Ambedkar lashes out at Ashok Chavan, says – Do you want to go to jail with your wife and mother-in-law?
विशेष प्रतिनिधी
नांदेड : देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीनिमित्त वंचित आघाडीच्या वतीने प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलत असताना प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यावर घणाघाती प्रहार केला.
भाजप नेत्यांपाठोपाठ आता वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही ‘बायको सासुबरोबर जेलमध्ये जायचं का ते ठरवा’ असं म्हणत काँग्रेसचे नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांना धमकीच दिली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘अशोकराव बोलले वंचितच्या गाडीत पेट्रोल भाजप भरते. अशोकराव, ही चूक आयुष्यात पुन्हा कधी करू नका. निवडणूक होऊ द्या, आमच्या गाडीमध्ये कुणी-कुणी पेट्रोल भरलं हे राहु द्या, आम्ही हायकोर्टात विचारतो आदर्श प्रकरणात कुणाकुणाचा फ्लॅट आहे. अशोक चव्हाण आपणाला बायको आणि सासुबरोबर जेलमध्ये जायचं का ते ठरवा?
तसंच, एक मोर्चा हायकोर्टावर गेला की, तुम्ही दडवलेली फाईल पुन्हा बाहेर येईल आणि सुशीलकुमार शिंदे यांनाही जेलमध्ये घेऊन जाईल, असा इशाराही बाळासाहेब आंबेडकर यांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App