महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर, देशात केजरीवालांची साथ; उद्धव ठाकरेंची काँग्रेस – राष्ट्रवादी पेक्षा वेगळी चाल!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह पूर्णपणे गमावल्यानंतर उद्धव ठाकरेंनी जाहीर वाच्यता न करता आपली नवीन राजकीय चाल खेळायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर आणि देशात अरविंद केजरीवाल यांची साथ घेत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसेच यूपीए पेक्षा आपली वेगळी राजकीय व्युहरचना मांडायला सुरुवात केली आहे.Prakash Ambedkar in Maharashtra, Kejriwal’s support in the country; Uddhav Thackeray’s move is different from Congress-NCP!!

उद्धव ठाकरे – प्रकाश आंबेडकर युतीची घोषणा आधीच झाली आहे. पण याच प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ मात्र नाकारली आहे. आता महाराष्ट्रात ज्या काँग्रेस – राष्ट्रवादीला प्रकाश आंबेडकर दूर ठेऊ इच्छितात, त्याच पद्धतीने दिल्लीच्या, पंजाबच्या आणि देशाच्या राजकारणात काँग्रेस पासून पूर्णपणे अंतर राखून असलेल्या आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्याशी उद्धव ठाकरे जुळवून घेताना दिसत आहेत.



अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत महान यांनी मातोश्री मध्ये येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांच्या नेतृत्वावर स्तुतिसुमने उधळली. यावेळी त्यांच्या समावेत खासदार संजय सिंह आणि राघव चढ्ढा हे देखील होते. या भेटीतच उद्धव ठाकरे यांची नवीन राजकीय चाल सुरू झाल्याची चाहूल दिसली आणि ही राजकीय चाल काँग्रेस राष्ट्रवादी आणि युपीए पेक्षा वेगळी असल्याचे देखील स्पष्ट झाले.

कारण अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस पासून दिल्ली आणि पंजाब या दोन्ही राज्यांबरोबरच देशाच्या पातळीवरही विशिष्ट अंतर राखले आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत केजरीवाल आणि भगवंत मान सहभागी झाले नाहीत. पंजाब मध्ये तर काँग्रेसच्या सरकारला पराभूत करून केजरीवाल आणि भगवंत मान यांनी आम आदमी पार्टीचे सरकार स्थापन केले. त्यामुळे आम आदमी पार्टी काँग्रेस प्रणित यूपीए बरोबर जुळवून घेण्याची शक्यताच फार कमी आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी केजरीवाल आणि भगवंत मान यांना मातोश्रीवर भेट देणे ही नव्या राजकीय समीकरणाची नांदी असल्याचे लक्षणे मानले जात आहे.

उद्धव ठाकरे यांचा राष्ट्रीय राजकारणात काहीही प्रभाव नाही. महाराष्ट्रात देखील शिवसेनेचे सर्वस्व त्यांनी गमावले आहे. अशा स्थितीत नवा राजकीय डाव मांडायचा असेल तर नवे गडी शोधले पाहिजेत हाच त्यांचा राजकीय होरा त्यांच्या नव्या खेळीतून दिसतो आहे.

उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर अरविंद केजरीवाल आणि स्वतः उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना या भेटीची माहिती दिली.

उद्धव ठाकरे म्हणाले :

अरविंद केजरीवाल माझ्या भेटीसाठी का आले आहेत, हे वेगळे सांगायची गरज नाही. देशातील प्रमुख विरोधी पक्षातील नेत्यांकडून सातत्याने संपर्क केला जात आहे. देशाला मजबूत करण्यासाठी एकत्र येण्याची गरज सगळेजण बोलून दाखवत आहे. भविष्यात त्यादिशेने पावले पडलेली दिसतील.

अरविंद केजरीवाल म्हणाले :

देशात एकमेव पक्ष आहे, जो २४ तास निवडणुकांचा विचार करतो. आम्ही देशाचा विचार करणारी माणसे आहोत. निवडणुका जाहीर झाल्यानंतर आम्ही राजकीय मुद्द्यांवर चर्चा करू. मागच्या दिवसांत महाराष्ट्रात गंभीर घटना घडल्या. उद्धव ठाकरेंच्या पक्षाची, निवडणूक चिन्हाची चोरी झाली. पण संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठिशी उभा आहे. सर्वोच्च न्यायालयात त्यांना दिलासा मिळेल, अशी मला आशा आहे.

येत्या सर्व निवडणुकांत ते बाजी मारतील. ईडी, सीबीआय आणि अन्य यंत्रणांचा वापर डरपोक लोक करतात. कारण ते आम्हाला घाबरतात. त्यांना करूद्या. शेवटी विजय सत्याचा विजय होतो.

कोरोनाकाळात महाराष्ट्रात त्यांच्या सरकारने चांगले काम केले. दिल्लीतील लोकांनी याकाळात मुंबई आणि महाराष्ट्राकडून बऱ्याच गोष्टी शिकल्या, त्याचे अनुकरण केले. त्यांनी राबविलेल्या उपाययोजना आम्ही अंगीकारल्या.

Prakash Ambedkar in Maharashtra, Kejriwal’s support in the country; Uddhav Thackeray’s move is different from Congress-NCP!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात