मखराम पवारांचा कित्ता गिरवावा, असे सांगत प्रकाश आंबेडकरांनी भुजबळांना पकडले पेचात!!

प्रतिनिधी

मुंबई : मखाराम पवारांचा कित्ता गिरवावा आणि छगन भुजबळ यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, असे सांगून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी छगन भुजबळांना पेचात पकडले आहे. Prakash Ambedkar caught Bhujbal in embarrassment by saying that Makhram Pawar’s lot should be lost!!

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीच्या दिवशी सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांचे मुव्हेबल पुतळे कार्यक्रम स्थळापासून हलविले होते आणि ते नंतर परत ठेवले. पण या मुद्द्यावरून छगन भुजबळ आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर तोंडसुख घेतले. पण त्या पलीकडे जाऊन प्रकाश आंबेडकरांनी छगन भुजबळ यांना वेगळ्याच पद्धतीने राजकीय पेचात पकडले आहे.

महाराष्ट्र सदनात सावरकर जयंतीच्या दिवशी घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून छगन भुजबळ यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, असे सांगून प्रकाश आंबेडकरांनी त्यांना माजी आमदार मखराम पवार यांची आठवण करून दिली आहे. शरद पवार मुख्यमंत्री असताना नागपुरात गोवारी हत्याकांड घडले. त्यावेळी हे सरकार असंवेदनशील आहे, असे सांगून मखराम पवार यांनी विधानसभेच्या सभागृहात राजीनामा जाहीर केला होता. त्यानंतर पवारांच्या सरकारने गोवारींच्या सगळ्या मान्य लगेच मान्य केल्या होत्या. याच मखराम पवारांचा कित्ता छगन भुजबळ यांनी गिरवावा आमदारकीचा राजीनामा द्यावा, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

पण या वक्तव्यातूनच त्यांनी छगन भुजबळ यांना पेचात पकडले आहे. त्याच वेळी गोवारी हत्याकांडाची आठवण करून देऊन शरद पवारांनाही डिवचले आहे. कारण याच गोवारी हत्याकांडानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवारांना शिवसेना – भाजप युतीकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यांना मुख्यमंत्रीपद गमवावे लागले होते.

या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी छगन भुजबळ यांना दुहेरी पेचात पकडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कुठलेच नेते कोणत्याही क्षणी सत्तेचे पद सोडत नाहीत हे देखील प्रकाश आंबेडकरांनी अप्रत्यक्षपणे अधोरेखित केले आहे.

Prakash Ambedkar caught Bhujbal in embarrassment by saying that Makhram Pawar’s lot should be lost!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात