हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनी औरंगाबादमध्ये राजकारण तापले : मुख्यमंत्र्यांनी कमी वेळ दिल्याने विरोधकांचा हल्लाबोल


प्रतिनिधी

औरंगाबाद : आज हैदराबाद मुक्ती संग्राम दिनी सकाळच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. भारताच्या स्वातंत्र्यानंतर 13 महिने मराठवाड्यातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. दरम्यान, 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाने आत्मसमर्पण केले. त्यानंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो.Politics heats up in Aurangabad on Hyderabad Liberation Day: Opposition lashed out at Chief Minister for giving him less time

आज या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावत ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी मराठवाड्यासाठी विविध घोषणा देखील केल्या. मात्र आता यावरुन राजकारण रंगलं आहे.



शिवसेना आणि शिंदे गट या निमित्ताने आमनेसामने आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री तात्काळ हैदराबादकडे रवाना होणार आहेत. मात्र शिंदेंच्या याच छोटेखानी दौऱ्यावर शिवसेनेनं आक्षेप घेत टीका केली आहे. तर शिवसेनेकडूनही मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी ध्वजारोहण करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना दिल्लीच्या पातशाहांसाठी जायचं होतं म्हणून पंधरा मिनिटात कार्यक्रम आटोपून घेतला. मुख्यमंत्र्यांसाठी ज्या घोषणा केल्या त्या जुन्या आहेत, त्यातील अनेक कामं सुरू आहेत.

नवीन कोणतीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केले नसून हा मराठवाड्यावर अन्याय आहे. पश्चिम महाराष्ट्रापेक्षा मराठवाडा मागे आहे. त्याला पुढे आणण्यासाठी हा क्षण होता मात्र मुख्यमंत्र्यांनी काही घोषणा केली. नऊ वाजता आम्ही पुन्हा एकदा अभिवादन करणार आहोत, असं दानवेंनी सांगितलं.

दानवे म्हणाले की, भूखंडाच्या सर्व फाईल थांबवल्या आहेत, एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. उद्योगासाठी हे घातक असून यापूर्वी असं कधीही झालेलं नाही. उद्योजक नाराज असून दिल्लीपर्यंत याच्या तक्रारी गेल्या आहेत, असंही दानवे म्हणाले.

मराठवाडा मुक्तिसंग्रामच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी फक्त 15 मिनिटं वेळ देणं हा मराठवाडा मुक्त करणाऱ्यांचा अवमान असल्याची टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी केली आहे.

Politics heats up in Aurangabad on Hyderabad Liberation Day: Opposition lashed out at Chief Minister for giving him less time

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात