Nitesh Rane : कोकणातील जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान शिवसेनेच्या संतोष परबांवर झालेल्या हल्ला प्रकरणावरून राणे कुटुंबीयांना लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले होते की, नितेश राणे यांची माहिती मी का देऊ? मी देणार नाही. यावरून त्यांना कणकवली पोलिसांनी नोटीस बजावून हजर राहण्याचे आदेश दिले होते. दुसरीकडे, त्या हल्ला प्रकरणावरून कोर्टात नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी सुरू असून नितेश राणेंना जेल की बेल याचा फैसला होणार आहे. Police searching for Nitesh Rane, notice to Narayan Rane, what exactly is going on in Konkan? Read more
प्रतिनिधी
मुंबई : कोकणातील जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान शिवसेनेच्या संतोष परबांवर झालेल्या हल्ला प्रकरणावरून राणे कुटुंबीयांना लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले होते की, नितेश राणे यांची माहिती मी का देऊ? मी देणार नाही. यावरून त्यांना कणकवली पोलिसांनी नोटीस बजावून हजर राहण्याचे आदेश दिले होते. दुसरीकडे, त्या हल्ला प्रकरणावरून कोर्टात नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी सुरू असून नितेश राणेंना जेल की बेल याचा फैसला होणार आहे. या पार्श्वभूमीवरून सत्ताधारी शिवसेना आणि विरोधातील भाजप यांच्या तुंबळ वाक्युद्ध सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांच्या जवळचे संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांना अटकेचा वॉरंट निघाला आहे. नितेश राणे यांना अटक यांना करण्यात यावी, याकरिता शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी सकाळी कणकवली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. तर दुसऱ्या बाजूला सभागृहात शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनीही नितेश राणे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यानंतर कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, नितेश राणे सध्या अज्ञातवासात गेले आहेत.
कोणत्याही प्रकारची चूक केली नसताना, केंद्रीय मंत्री मा. नारायण राणे यांना महाराष्ट्राचे पोलिस नोटीस बजावून आमच्या समोर येऊन उभे रहा असे आदेश देतात…वारे वा..ठाकरे सरकार!फुले, शाहू, आणि डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन सरकार चालवतो म्हणायचे आणि तालिबान्यांसारखे वागायचे! pic.twitter.com/309mBmn382 — ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR ) (@ShelarAshish) December 29, 2021
कोणत्याही प्रकारची चूक केली नसताना, केंद्रीय मंत्री मा. नारायण राणे यांना महाराष्ट्राचे पोलिस नोटीस बजावून आमच्या समोर येऊन उभे रहा असे आदेश देतात…वारे वा..ठाकरे सरकार!फुले, शाहू, आणि डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन सरकार चालवतो म्हणायचे आणि तालिबान्यांसारखे वागायचे! pic.twitter.com/309mBmn382
— ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR ) (@ShelarAshish) December 29, 2021
याप्रकरणी नितेश राणे तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरील कारवाईवरून भाजप नेते आशिष शेलार यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, कोणत्याही प्रकारची चूक केली नसताना, केंद्रीय मंत्री मा. नारायण राणे यांना महाराष्ट्राचे पोलिस नोटीस बजावून आमच्या समोर येऊन उभे रहा असे आदेश देतात… वारे वा..ठाकरे सरकार! फुले, शाहू, आणि डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन सरकार चालवतो म्हणायचे आणि तालिबान्यांसारखे वागायचे!”
दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राणेंना आलेल्या नोटिसीवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, राणेंच्या पाठीशी भाजप खंबीरपणे उभा आहे, राज्यात पोलिसांना दरोडेखोर, बलात्काऱ्यांना पकडायला वेळ मिळत नाही. मात्र घरावर जाऊन नोटिसा चिकटवतात हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे, याचा मी निषेध करतो. सिंधुदुर्गमध्येही अनेक बेकायदेशीर धंदे सध्या आहेत, त्याकडे लक्ष द्यायला पोलिसांना वेळ नाही, मात्र राणेंच्या पाठी लागायला वेळ आहे, अशी टीकाही फडणवीसांनी केली आहे.
दरम्यान, नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू आहे. भाजप आमदार नितेश राणे आणि सचिन सातपुते यांचे फोटो एकत्र असल्याचे पुरावे कोर्टासमोर वकील घरत यांनी दाखवले. यानंतर राणेंच्या वकिलांनी फोटो कुणासोबतही असला म्हणजे संबंध असतोच असे नाही, असे सांगितले. कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
दुसरीकडे, शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांजवळ प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, पोलीस नितेश राणेंना शोधत आहेत. केंद्रीय मंत्री म्हणताय माहिती आहे, पण सांगणार नाही. हे कायद्याचे उल्लंघन आहे. आपण केंद्रीय मंत्री आहात, पोलिसांना सहकार्य करा. कायद्यापासून महत्त्वाची माहिती लपवू नका. आपला मुलगा असेल तरी माहिती देणे गरजेचे आहे. अन्यथा आरोपींना पाठीशी घातलं म्हणून तुमच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो. एका राज्याच्या मुख्यमंत्र्याने लपवले असेल तर…असे सूचक विधानही त्यांनी नितेश यांचे नाव न घेता केले. यावर प्रश्न विचारला असता मी आताच बोलत नाहीय. काही सांगता येत नाही म्हणत त्यांनी कोणाचेही स्पष्ट नाव घेणे टाळले. राजकीय सुडापोटी आमच्यावर कारवाया केल्या. महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल केले, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.
Police searching for Nitesh Rane, notice to Narayan Rane, what exactly is going on in Konkan? Read more
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App