श्रीनगरमध्ये भर रस्त्यात दहशतवाद्यांच्या गोळीबार, पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू


विशेष प्रतिनिधी

श्रीनगर – श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी भर दुपारी बाजारपेठेत एका पोलिस अधिकाऱ्याची गोळी झाडून हत्या केली. श्रीनगरमधील खन्यार भागात ही घटना घडली. उपनिरीक्षक अर्शिद अहमद असे या पोलिस अधिकाऱ्याचे नाव असून ते प्रशिक्षणार्थी होते.Police officer killed by militants

रुग्णालयात एका आरोपीच्या आरोग्य तपासणीसाठी हजर राहून ते पोलिस ठाण्यात परतत असताना बाजारपेठेत दुपारी दीडच्या सुमारास दहशतवाद्यांनी हल्ला केला. अत्यंत जवळून त्यांच्या पाठीवर गोळ्या झाडल्या गेल्या. गोळ्या लागल्याने जखमी झालेल्या अहमद यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.



त्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सुरक्षा रक्षकांनी जागेची नाकाबंदी केली असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.दरम्यान राजौरी येथे सुरक्षा रक्षकांनी एका दहशतवाद्याला ठार मारले. काही दहशतवादी भारतात घुसखोरी करून लपून बसले

असल्याची माहिती गुप्तचरांनी दिल्यानंतर मांजाकोट भागात लष्कर आणि पोलिसांकडून संयुक्त शोधमोहिम सुरु होती. त्यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यामुळे जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात एक दहशतवादी मारला गेला.

Police officer killed by militants

महत्त्वाच्या बातम्या.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात