विशेष प्रतिनिधी
मुंबई : डोंबिवलीत एक डान्सबारवर मानपाडा पोलिसांनी कारवाई केली होती. या कारवाई दरम्यान शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप बारमालक इंद्रजित सिंग यानी केला आहे. Police harass for money; Dancebar owner’s ; Illegal recovery in Thane – Dombivali
इंद्रजित सिंग यांचा शेहनाई बार रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे आरोप करत पोलिसांनी ५ बार बालांना ताब्यात घेतले होते. आता या प्रकरणात बारमालक इंद्रजित सिंग सैनी यांनी मोठा खुलासा केला आहे एवढेच नाही तर मानपाडा पोलिसांवर गंभीर आरोप देखील केले आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांनी जल समाधी घेण्याची धमकी दिल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी 20 कर्मचाऱ्यांना घेतले ताब्यात
पोलिसांची कारवाई बेकायदेशीर होती. मला शिवीगाळ पोलीस पैशांसाठी माझा छळ करतात. आता माझ्याकडून मानपाडा पोलीस ठाण्याच्या सिनियर ला ८५ हजार एसीपी ला १५ हजार डीसीपीला पण पैसे दिले जातात. डिसीपीच्या कलेक्टरकडून आता २५ हजाराची मागणी होत आहे. कोरोना काळात धंदा नाही तर दुसरीकडे पोलिस पैशासाठी छळ करतात. या गंभीर आरोपानंतर कल्याण डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिस अधिकाऱ्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
– पोलिस पैशांसाठी छळ करतात – बारमालकाचा गौपयस्फोटा नंतर खळबळ – मानपाडा पोलिसांवर वसुलीचे गंभीर आरोप – शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप – कोरोना काळात धंदा नाही – दुसरीकडे पोलिस पैशासाठी छळ करतात
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App