फेसबुकद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून ओळख झालेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने अभियांत्रिकी महिलेवर बलात्कार केल्यांची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. Police constable raped the engineer married women, case registered in bhosari police station
विशेष प्रतिनिधी
पुणे : फेसबुकद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून ओळख झालेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने अभियांत्रिकी महिलेवर बलात्कार केल्यांची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसेच महिलेच्या नकळत तिचे नग्न फोटो व व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर टाकण्याची धमकी आरोपीने देत तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे.
विक्रम गणपत फडतरे (वय ३४, रा. भिलारेवस्ती, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पीडित ३० वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी व अकुर्डी तसेच इतर वेगवेगळ्या ठिकाणी १५ सप्टेंबर २०२१ ते ११ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला आहे.विक्रम फडतरे हा पुणे शहर पोलीस दलाच्या वाहतूक शाखेचा कर्मचारी आहे. विवाहित असलेली पीडित फिर्यादी महिला इंजिनिअर असून एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे.
पोलीस कर्मचारी असलेल्या विक्रम फडतरे याने इंजिनीयर महिलेला फेसबुक द्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. त्यानंतर तिच्याशी मैत्री वाढवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान, इंजिनीयर महिलेचे नग्न फोटो व व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीशी वारंवार मनाविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध केले, असे तक्रारीत सांगण्यात आले आहे. याबाबत पुढील तपास भोसरी पोलीस करत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App