प्रतिनिधी
ठाणे : ठाकरे – पवार सरकारने दहीहंडी साजरी करण्यावर बंदी लादल्याने ती बंदी धुडकावून दहीहंडी साजरी करणारच असा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी घेतला आहे. त्यामुळे ठाणे पोलिसांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.Police arrested MNS leader Avinash Jadhav in thane
कोरोना फक्त हिंदूंच्या सणांना का दिसतो? आम्ही कायद्याचे पालन करणारे आहोत. तुम्ही नियमावली द्या, त्याचे पालन करून आम्ही दहीहंडी साजरी करू. काहीही झाले तरी मनसे दहीहंडी साजरी करणारच! अविनाश जाधव, प्रमुख, ठाणे जिल्ह्याध्यक्ष
अविनाश जाधवांचे बेमुदत उपोषण!
सोमवारी सकाळी ठाण्याचे मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाण्यात दहीहंडीसाठी मोठा स्टेज बांधला होता, तिथेच जाधव यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. त्यामुळे तिथे पोलिस आले आणि त्यांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले, तसेच स्टेज काढण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
काहीही झाले तरी दहीहंडी बांधणारच असे अविनाश जाधव म्हणाले. ठाकरे सरकारने राज्यातील दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरा न करणायचा आदेश काढला आहे. मागील आठवड्यात दहीहंडी उत्सव मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी दहीहंडी साजरी करू नका, असा आदेश दिला. मात्र मनसे आणि भाजप यांनी त्याला विरोध केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App