सदर मादी पिल्लांचे वय अंदाजे पंधरा ते तीस दिवसापर्यंत आहे. दरम्यान ती पिल्ले खूप लहान आहेत.
विशेष प्रतिनिधी
हिंजवडी : पिंपरी चिंचवड मधील आयटीनगरी जवळील नेरे गावठाण परिसरात सोमवार (दि.२४) रोजी सकाळी बिबट्याची पिल्ले आढळून आली आहेत.नेरे गावठाण येथील सीताई बंधाऱ्या जवळील मोहन जाधव, राहुल जाधव यांच्या उसाच्या शेतात ही तीन बिबट्याची मादी पिल्ले आढळून आली.दरम्यान मोहन जाधव व राहुल जाधव यांनी तात्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.Pimpri Chinchwad: Three female leopard cubs found in sugarcane
माहिती मिळताच पौड वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण, वनपाल मीरा केंद्रे, वनरक्षक पांडुरंग कोपनर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ गणेश सोरटे यांनी घटना स्थळी तत्काळ धाव घेऊन मादी पिल्ले ताब्यात घेतली.तसेच ,रात्री अपरात्री शेतात जाताना एकट्याने जाणे टाळावे, खबरदारी घ्यावी असे आवाहन शेतकरी राहुल सीताराम जाधव यांनी केले आहे.
दरम्यान मागील अनेक महिन्यांपासून नेरे दत्तवाडी, जांबे, सांगावडे, कासरसाई, कुसगावं, दारुंब्रे परिसरात बिबट्याचा अधिवास असल्याचे पाहायला मिळाले आहे. अनेक ठिकाणी बिबटे मादी, पिल्लां समवेत कळपाने फिरताना निदर्शनास आले आहे.
वन अधिकारी संतोष चव्हाण यांनी सांगितले की , “सदर मादी पिल्लांचे वय अंदाजे पंधरा ते तीस दिवसापर्यंत आहे. दरम्यान ती पिल्ले खूप लहान आहेत.त्यामुळे ते त्यांच्या आईशिवाय शिवाय राहू शकत नसल्याने त्यांना पुन्हा सायंकाळी त्यांच्या आहे त्या ठिकाणी सोडण्यात येणार आहे
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App