पिंपरी : भाजप महापौरांचा शरद पवारांना चरणस्पर्श करत नमस्कार ; जनतेच्या भुवया उंचावल्या

काल (दि. 16) शरद पवार व भाजपच्या महापौर माई ढोरे यांची भोसरी येथील महापालकेच्या रुग्णालयातील आयसीयू उद्‌घाटानप्रसंगी भेट झाली. Pimpri: BJP mayor greets Sharad Pawar by touching his feet; The eyebrows of the people were raised


विशेष प्रतिनिधी

पिंपरी : राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार पिंपरी चिंचवडच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. काल (दि. 16) शरद पवार व भाजपच्या महापौर माई ढोरे यांची भोसरी येथील महापालकेच्या रुग्णालयातील आयसीयू उद्‌घाटानप्रसंगी भेट झाली.

यावेळी माई ढोरे यांनी पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच खाली वाकून चरणस्पर्श केल्याने पिंपरी चिंचवडच्या राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजपच्या विद्यमान महापौरांनी शरद पवार यांचा आशीर्वाद घेतल्याने त्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

मात्र या चर्चांना उधाण येताच महापौर माई ढोरे यांनी सांगितले की, मी भारतीय जनता पार्टीची महापौर आहे. शरद पवार हे सर्वच गोष्टींनी श्रेष्ठ आहेत. त्यांच्या वयाचा मान-सन्मान ठेवेणे आवश्‍यक आहे. भोसरी येथील रुग्णालयात त्यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. महापौर या नात्याने मी तिथे उपस्थित होते. त्यांचे स्वागत मी केले. त्यांच्या वयाचा मान म्हणून मी दर्शन घेतले. यामध्ये वेगळ्या गोष्टींची चर्चा होण्याचे काही काम नाही. थोरामोठ्यांचा आशीर्वाद घेणे आपली संस्कृती आहे. अस स्पष्टीकरण देत त्यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.

Pimpri: BJP mayor greets Sharad Pawar by touching his feet; The eyebrows of the people were raised

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात