विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे हे भारतातील चौथे शहर आहे जिथ भुमिगत मेट्रो मार्ग नदीच्या खालच्या बाजून जात आहे.आत्तापर्यंत पुणे मेट्रोच 60% काम पुर्ण झाल आहे. दरम्यान कृषी महाविद्यालय येथून भुमिगत मार्ग बनवणारे टनेल बोरिंग मशीन बुधवार पेठ येथे पोहचत आहे. पुणे मेट्रोच्या कामाचा हा महत्वपूर्ण टप्पा आहे.
काल सिव्हिल कोर्ट स्टेशन पार करून मुठा नदीच्या खालून बुधवार पेठ येथे टनेल बोरींग मशीन पोहचत आहे.मुठा नदीच्या खालून जाणारा बोगदा सुमारे 33मीटर खोल आहे तर नदीपात्राच्या तळापासून साधारणपणे 10मी खालून जाणार आहे.
महत्वाच म्हणजे कोणत्याही मेट्रो मार्गावर प्रवासी सेवा सेवा सुरू करण्याआधी कमिश्नर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी यांची परवानगी घेणे गरजेचे असते. मेट्रोची दुसरी मार्गिका कोथरूड (वनाज) येथून जाणार आहे. याची चाचणी देखील 7जुलैला घेण्यात आली आहे.
या महत्वाच्या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी म्हंटले आहे कि, ‘महामेट्रो लवकरात लवकर पुणे मेट्रो सुरु करण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यासाठी मेट्रोची उभारणी अत्यंत वेगाने सुरु आहे. पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, इतर सर्व शासकीय संस्थाच्या सहयोगामुळे आणि पुणेकरांच्या उस्फुर्त सहभागामुळे महामेट्रोने हा महत्वपूर्ण टप्पा पूर्ण केला आहे.’
#पुणेमेट्रो च्या भूमिगत कामाचा एक महत्वपूर्ण टप्पा, टनेल बोरिंग मशीन बुधवार पेठ स्थानका पर्यंत पोहोचले. #PuneMetro achieves another breakthrough at Budhwar Peth #MetroStation. Read more:https://t.co/w7Fc99Ayz0 pic.twitter.com/P0D2mqYhe0 — Pune Metro Rail (@metrorailpune) July 22, 2021
#पुणेमेट्रो च्या भूमिगत कामाचा एक महत्वपूर्ण टप्पा, टनेल बोरिंग मशीन बुधवार पेठ स्थानका पर्यंत पोहोचले. #PuneMetro achieves another breakthrough at Budhwar Peth #MetroStation.
Read more:https://t.co/w7Fc99Ayz0 pic.twitter.com/P0D2mqYhe0
— Pune Metro Rail (@metrorailpune) July 22, 2021
या दरम्यान महामेट्रोचे तांत्रिक सल्लागार श्री. शशिकांत लिमये, उपस्थित होते. पुणे मेट्रोच्या अत्यंत कठीण अशा तांत्रिक व गुंतागुंतीच्या डिझाईनसाठी श्री. लिमये यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.
पुणे मेट्रोच्या पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मार्गावरील शिवाजीनगर ते स्वारगेट हा 6 किमीचा मार्ग भुयारी असणार आहे. अत्यंत दाट लोकवस्तीच्या भागातून जाणारा हा मार्ग शिवाजीनगर बस स्थानक, सिव्हिल कोर्ट, बुधवार पेठ, महात्मा फुले मंडई आणि स्वारगेट या शहराच्या महत्वपूर्ण ठिकाणांना जोडणार आहे.
या भुयारी मार्गाच्या कामासाठी 3 टनेल बोरिंग मशीन वापरण्यात येत असून त्यांनी आत्तापर्यंत 12 किमी पैकी 7 किमीचा भुयारी मार्ग बनविला आहे. 2 टनेल बोरिंग मशीनच्या सहाय्याने कृषी महाविद्यालय येथून भूमिगत मार्गाचे कामाचा प्रारंभ करण्यात आला होता, तर 1 टनेल बोरिंग मशीन स्वारगेट येथून मंडईच्या दिशेने काम करत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App