आगीची बातमी समजताच सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, वडखळ पोलीस आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.Pen: A fire broke out due to a short circuit in Sagarwadi at Shirki Chaal No. 2, burning down the entire house
विशेष प्रतिनिधी
पेण : पेण तालुक्यातील शिर्की चाळ नंबर 2 येथील सागरवाडीत शॉर्टसर्कीटमुळे आग लागली.दरम्यान या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले.शनिवारी (22 जानेवारी) सकाळी ही घटना घडली.यशवंत पाटील, सुमन पाटील व भूषण पाटील यांचे सामूहिक मालकीचे हे घर आगीत पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे.
आगीची बातमी समजताच सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, वडखळ पोलीस आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.दरम्यान पोलीस व महसूल विभागाकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला.जेएसडब्ल्यू स्टील कंपनीने सीएसआर फंडातून सदर कुटुंबाला मदत करावी, अशी मागणी सागरवाडी ग्रामस्थांनी केली आहे.
शनिवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास कुटुंबातील सर्व व्यक्ती कार्ला येथील एकविरा देवीच्या दर्शनाला निघाले होते. दरम्यान घरातून निघताना सर्व उपकरणे बंद केली होती.परंतु त्यांचे लाकडाचे जुने घर असल्याने व उंदीर त्रास देत असल्याने घरातील एकच बल्ब सुरू ठेवला होता.दरम्यान याच बल्बने शॉर्टसर्किटमुळे सकाळी 6 ते 6.30 वाजण्याच्या घराला भीषण आग लागली.
दरम्यान काही क्षणातच संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले.तसेच या आगीत घरातील सर्व फर्निचर, संपूर्ण विद्युत फिटिंग, टीव्ही, फ्रीज, फॅन आदी इलेक्ट्रॉनिक वस्तू, सर्व महत्वाची कागदपत्रे व भात, तांदूळ, सर्व कडधान्य आदी जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App