विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रातील सरकार स्थापना प्रक्रियेबद्दल काल दिलेल्या मुलाखतीत विविध दावे – प्रतिदावे केले आहेत. या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठे पडसाद उमटले असून अनेक नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. Pawar’s claim of Modi’s offer: Chandrakantdada said, Pawar’s history is not true !!
महाराष्ट्रात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येऊन सरकार बनविण्याची ऑफर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती, असा दावा देखील शरद पवार यांनी त्या मुलाखतीत केला आहे. मात्र, शरद पवारांच्या या दाव्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पवारांना चांगले चिमटे काढले आहेत. शरद पवार यांचा इतिहास हा कधी खरे न बोलण्याचा आहे आणि मोदींनी दिलेली कोणतीही ऑफर दिली तर पवार धावत जातात. मग मोदींनी खरेच महाराष्ट्रात सरकार बनवण्याची ऑफर दिली असती तर पवार इतके दिवस का थांबले?, असा बोचरा सवालही चंद्रकांतदादा पाटील यांनी केला आहे.
त्याच वेळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधी संदर्भात शरद पवारांनी मी अजित पवारांना तिकडे पाठवले असते तर सरकार टिकले असते, असा दावा केला आहे. शरद पवार यांच्या या दाव्यासंदर्भात पुण्यामध्ये अजित पवारांना प्रश्न विचारल्यावर पक्षाचे वरिष्ठ नेते एकदा बोलल्यावर बाकीच्यांनी बोलायचे नसते, असे सांगून त्या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले. मला जेव्हा बोलायचे त्या योग्य वेळी मी बोलेन एवढेच सांगून ते निघून गेले. एकूण शरद पवार यांच्या दाव्यावर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोदी-पवार विशेष राजकीय मैत्रीची चर्चा सुरू झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App